पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/99

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३६ गीतारहस्य अथवा कर्मयोग-परिशिष्ट म्हणजे गीतेंतील धर्मप्रतिपादनाचे स्वरूप पहिल्यापासूनच बहुतेक हल्लींच्या गीतेंतील प्रतिपादनासारखेंच असावें असें मानणें भाग पडतें. गीतारहस्यांतील विवचन याच धोरणानें केलेले आहे; तथापि हा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे गीताधर्माचे मलरूप व परंपरा यासैबंधानें ऐतिहासिकदृष्टया आमच्या मतें काय निष्पन्न होतें तें थेोडक्यांत सांगतों. वैदिक धर्माचे अत्यंत प्राचीन स्वरूप भक्तिप्रधान, ज्ञानप्रधान अगर योगप्रधानहि नसून यज्ञमय म्हणजे कर्मप्रधान होतें, आणि वेदसंहिता व ब्राह्मण यांतून मुख्यत्वंकरून हाच यज्ञयागादि कर्मपर धर्म प्रतिपादिलेला आहे, असें गीतारहस्याच्या दहाव्या प्रकरणांत दाखविले आहे. या धर्माचेच पुढे जैमिनीच्या मीमांसासूत्रांत व्यवस्थित विवेचन केले असल्यामुळे त्यास ‘मीमांसकमार्ग’ हें नांव प्राप्त झाले आह. पण मीमांसा हें नांव जरी नवें असले, तरी यज्ञयागादि धर्म प्राचीन आहे, किंबहुना इतिहासदृष्टया वैदिक धर्माची ही पहिली पायरी आहे, याबद्दल कांहींच शंका नाही. ‘मीमांसक मार्ग' हें नांव प्राप्त होण्यापूर्वी यास त्रयीधर्म, म्हणजे तीन वेदांनी प्रतिपादिलेला धर्म, हें नांव होतें; व तेंच गीतंतहि आलेले आहे (गी.९.२०व २१पहा). कर्ममय त्रयीधर्म याप्रमाणें जारीनें चालू असतां कर्मानें म्हणजे केवळ यज्ञयागादिकांच्या बाह्य खटाटोपानें परमेश्वराचें ज्ञान कसें होणार ? ज्ञान होणें ही मानसिक स्थिति असल्यामुळे परमेश्वरस्वरूपाचा विचार कल्याखेरीज ज्ञान होणे शक्य नाहीं, इत्यादि प्रश्न व कल्पना निघून क्रमाक्रमानें त्यांतच औपनिषदिक ज्ञानाचा प्रादुर्भाव झाला, असें छांदोग्यादि उपनिषदांच्या प्रारंभीं जा अवतरणें आहत त्यांवरून स्पष्ट होतें. या औषनिषदिक ब्रह्मज्ञानासच पुढे वेदान्त हें नांव प्राप्त झाले आहे. पण मीमांसा शब्दाप्रमाणें वेदान्त हा शब्द जरी मागाहून निघालला आहे, तरी ब्रह्मज्ञान किंवा ज्ञानमागै त्यामुळे नवा ठरत नाहीं. कर्मकांडानंतर ज्ञानकांड निघालें हें खरें; तथापि दोन्हीहि प्राचीन होत हें लक्षांत ठेविले पाहिजे. कापिलसांख्य ही या ज्ञानमार्गाचीच दुसरी पण स्वतंत्र शाखा आहे. ब्रह्मज्ञान अद्वैती तर सांख्य द्वैती असून सृष्टयुत्पतिक्रमासंबंधानें सांख्यांचे विचार मूळांत भिन्न आहेत हें गीतारहस्यांत सांगितले आहे. परंतु औपनिषदिक अद्वैती ब्रह्मज्ञान व सांख्यांचे द्वैती ज्ञान हीं दोन्हीहि मूळांत जरी याप्रमाणें भिन्न असली तरी केवळ ज्ञानदृष्टया पाहिलें तर हे दोन्ही मार्ग तत्पूर्वीच्या यज्ञयागादि कर्ममार्गास एकसारखेच विरोधी होते. म्हणून कर्माचा ज्ञानाशों मेळ कसा घालवा, हा प्रश्न साहजिकरीत्या उद्भवून उपनिषत्कालीच या वाबतीत दोन पक्ष झालेले होते. कर्म व ज्ञान यांचा नित्य विरोध असल्यामुळे ज्ञान झाल्यावर कर्म सोडून देणें प्रशस्तच नव्हे तर अवश्यहि होय, असें बृहदारण्यकादिक उपनिषदं व सांख्य म्हणू लागले.