पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
प्रस्तावना

१३

गीतेवर जीं अनेक भाष्यें व टीका आहेत, किंवा पूर्वी अगर अलीकडे गीतेचीं प्राकृतांत जी भाषांतरें झालीं आहेत त्यांचे प्रस्तुत ग्रंथ लिहितांना इतर बाबतीत नेहमींच प्रसंगानुसार थोडेंबहुत सहाय्य झालेलें असल्यामुळें त्या सर्वांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोंत, हे येथें सांगणे अवश्य आहे. आणि तसेंच ज्या पाश्चिमात्य[टंकनभेद] पंडितांच्या ग्रंथांतील सिद्धान्तांचा जागोजाग उल्लेख केलेला आहे त्यांचेहि आभार मानिले पाहिजेत. किंबहुना या सर्व ग्रंथांच्या मदतीखेरीज प्रस्तुतचा ग्रंथ लिहितां आला असता कीं नाही याची वानवाच असल्यानें या प्रस्तावनेच्या आरंभी "संतांची उच्छिष्टें बोलतों उत्तरे" हें तुकारामबुवांचे वाक्य आम्हीं घातलें आहे. सर्व कालीं एकसारखेंच लागूं पडणारें म्हणजे त्रिकालाबाधित ज्ञान सांगणाऱ्या गीतेसारख्या ग्रंथानें कालभेदानुरूप नवें नवें स्फुरण मनुष्याला प्राप्त व्हावे यांत कांही नवल नाही; कारण अशा व्यापक ग्रंथाचा हा धर्मच असतो. परंतु तेवढ्यानें प्राचीन पंडितांनी असल्या ग्रंथांवर जे परिश्रम केलेले असतात ते व्यर्थ होत नाहींत. गीतेंची इंग्रजी, जर्मन वगैरे भाषांतून पाश्चात्य पंडितांनी जी भाषान्तरें केली आहेत त्यासहि हाच न्याय लागू पडतो. हि भाषांतरे प्रायः गीतेच्या प्राचीन टीकाकारांस अनुसरून असतात. तथापि कांहीं पाश्चिमात्य[टंकनभेद] पंडितांनी गीतेचा स्वतंत्ररीत्या अर्थ लावण्याचीहि खटपट सुरू केली आहे. पण खऱ्या (कर्म -) योगाचें तत्त्व अथवा वैदिक धार्मिक संप्रदायाचा इतिहास नीट लक्षांत न आल्यामुळे, अथवा बहिरंग परिक्षणाकडेच त्यांचा विशेष काळ असल्यामुळें, किंवा दुसऱ्या अशाच कारणांनी, पाश्चात्य[टंकनभेद] पंडितांची हि विवेचनें पुष्कळ अपुरीं व कांहीं काही स्थळी तर निःसंशय भ्रामक व चुकीचीं आहेत. गीतेवरील पाश्चात्य[टंकनभेद] पंडितांच्या या ग्रंथांचा येथें सविस्तर विचार किंवा परीक्षा करण्याचें कारण नाहीं. त्यांनीं उपस्थित केलेल्या प्रमुख प्रश्नांसंबंधीं आमचें काय म्हणणें आहे तें या ग्रंथाच्या परिशिष्टप्रकरणांत दिलें आहे. तथापि अलीकडे आमच्या पहाण्यांत आलेल्या गीतेवरील कांही इंग्रजी लेखांचा उल्लेख येथें केला पाहिजे. पहिला लेख मि. ब्रुक्स यांचा होय. मि. ब्रुक्स हे थिआसफिस्ट पंथाचे असून भगवद्गीता[टंकनभेद] कर्मयोगपर आहे असें त्यांनी आपल्या गीतेवरील ग्रंथांत निरूपण केलें आहे व आपल्या' व्याख्यानांतूनहि हेंच मत ते प्रतिपादन करीत असतात. दुसरा लेख मद्रासचे मि. एस्. राधाकृष्णम् यांचा असून तो छोट्याशा निबंधारूपानें अमेरीकेंतल्या 'सर्वराष्ट्रीय नीतिशास्त्रावरील त्रैमासिकांत' प्रसिद्ध झाला आहे (जुलै १९११). यांत आत्मस्वातंत्र्य व नीतिधर्म या दोन विषयांसंबंधानें गीता व कान्ट यांचे साम्य दाखविलें आहे. आमच्या मतें हे साम्य अधिक व्यापक असून, ग्रीन याची नैतिक उंपपत्ति कान्टपेक्षांही गीतेशीं अधिक जुळती आहे. पण या दोन्ही प्रश्नांचा[टंकनभेद] खुलासा या