पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
विषयप्रवेश

कशी आहे, काव्यदृष्ट्या त्यात माधुर्य किंवा प्रसाद हा गुण कितपत वठला आहे, ग्रंथातील शब्दरचना व्याकरणशुध्द आहे किंवा त्यांत कांही जुने आर्ष प्रयोग आहेत, अगर कोणकोणत्या मतांचा, स्थलांचा किंवा व्यक्तींचा त्यांत उल्लेख केलेला आहे, व त्यावरून ग्रंथाचा कालनिर्णय करण्यास अथवा तत्कालीन समाजस्थिती समजण्यास कांही साधन मिळतें कीं नाहींं, ग्रंथांतील विचार स्वतंत्र आहेत की दुसऱ्यापासून घेतलेले आहेत, व दुसऱ्यापासून घेतलेले असल्यास कोठून व कोणते, इत्यादि केवळ बाह्यांगांचे विवेचन करणें यास 'बहिरंगपरीक्षण' असें म्हणतात[टंकनभेद].