पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
प्रस्तावना

त्यांतील सिद्धान्त ध्यानांत ठेवण्यासहि त्यामुळें सोपें पडेल असा ही संस्कृत वचनें देण्याचा दुसराहि पोटहेतु आहे. तथापि सर्वच वाचक संस्कृत जाणणारे असण्याचा संभव नसल्यामुळे, एकंदर ग्रंथाची रचना अशी ठेविली आहे की, संस्कृत न जाणणारा वाचक संस्कृत श्लोक[टंकनभेद] सोडून देऊन ग्रंथ वाचूं लागल्यास त्याच्या वाचनांत अर्थाचा कोठेंही खंड पडूं नये. यामुळे संस्कृत श्लोकाचें[टंकनभेद] शब्दशः भाषांतर न देतां कित्येकदां त्यांतील सारांश देऊनच निर्वाह करून घ्यावा लागला आहे. परंतु मूळ श्लोक[टंकनभेद] वर दिलेला असल्यामुळें या पद्धतीनें कोणताही गैरसमज होण्याची भीति रहात नाहीं.

कोहिनूर हिऱ्याची अशी गोष्ट सांगतात कीं, तो हिंदुस्थानांतून विलायतेंत नेल्यावर तेथें त्याचें पुनः नवे पैलू पाडण्यांत आले; व त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसूं लागला. हिऱ्यास लागूं पडणारा हा न्याय सत्यरूपी रत्नासहि लागूं पडतो. गीतेंतील धर्म सत्य व अभय खरा; पण तो ज्या काळी ज्या स्वरूपानें सांगण्यात आला त्या देशाकालादि परिस्थितींत पुष्कळ फरक पडल्यामुळें, कित्येकांच्या डोळ्यात त्याचें तेज आतां पूर्वीप्रमाणें भरत नाहीसें झालें आहे. कोणतें कर्म चांगले व कोणतें वाईट हें ठरविण्यापूर्वी, कर्म करावे किंवा नाही हा सामान्य प्रश्नच ज्या काळी महत्त्वाचा समजत असत, तेव्हा गीता सांगितलेली असल्यामुळें, त्यांतील बराच भाग आतां कित्येकांस अनवश्यक वाटतो; आणि त्यावरच आणखी निवृत्तिमार्गीय टीकाकारांचे सावरण पडल्यामुळें गीतेंतील कर्मयोगाचें विवेचन सध्याचे काळीं पुष्कळांस दुर्बोध झालें आहे. शिवाय आधिभौतिक ज्ञानाची अर्वाचीन कालीं पाश्चिमात्य[टंकनभेद] देशांत जी वाढ झाली आहे त्यामुळें अध्यात्मशास्त्राला धरून केलेलीं प्राचीन कर्मयोगाची विवेचनें हल्लींच्या कालास पूर्णपणें लागूं पडणे शक्य नाहीं, अशीहि कित्येक नव्या विद्वानांची समजूत झालेली असत्ये. हे समज खरे नव्हेत, असें दाखविण्यासाठी गीतारहस्यातील विवेचनांतच गीतेच्या सिद्धान्तांच्या जोडीचे पाश्चात्य[टंकनभेद] पंडितांचे सिद्धान्त आम्हीं जागोजाग संक्षेपाने दिले आहेत. वास्तविक पाहिलें तर गीतेंतील धर्माधर्मविवेचनास या तुलनेनें अधिक बळकटी येत्ये असें नाही. तथापि अर्वाचीन काली झालेल्या आधिभौतिक शास्त्राच्या अश्रुतपूर्व वाढीनें ज्यांची दृष्टि दिपून गेली आहे, किंवा सध्यांच्या एकदेशीय शिक्षणपद्धतीमुळें नीतिशास्त्राचा आविभौतिक म्हणजे बाह्य दृष्टीनें विचार करण्यास जे शिकले आहेत, त्यांस या तुलनेवरून एवढें स्पष्ट कळून येईल कीं, मोक्षधर्म व नीति हे दोन्ही विषय आधिभौतिक ज्ञानाच्या पलीकडचे असल्यामुळें प्राचीन काळीं आमच्या शास्त्रकारांनीं या बाबतींत जे सिद्धान्त केले आहेत त्यांच्या पुढें मानवी ज्ञानाची गति अद्याप गेलेली नाहीं, इतकेंच नव्हे तर पाश्चिमात्य