पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/101

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मयोगशास्त्र ६९ चेच नीतिग्रंथ आमच्याकडील इंग्रजी पाठशालांतून प्रायः पूढर्वात असल्यामुळे `धर्म’ हाच सामान्य शब्द मुख्यत्वंकरून व्यावहारिक नीतिबंधनास किंवा समाजधारणार्थ निघाललेया व्यवस्थेस आम्ही कां लावतों हें वरील विवेचनावरून कळून येईल. मृहाभारत, भगवद्गीता या संस्कृत ग्रंथांतच नव्हे, तर प्राकृतांतहि व्यावहारिक कर्तव्ये किंवा नियम या अर्थी ‘धर्म’ शब्दाचा नेहमीं उपयोग करीत असतात. कुलधर्म आणि कुलाचार हे शब्द आपण समानार्थक समजतों. भारती युद्धांत पृथ्वीनें गिळलेलें रथाचे चाक उचलून वर घेण्याकरितां कणै रथाखाली उतरल्यावर अर्जुन त्याचा वध करण्यास उद्युक्त झालेला पाहून “शत्रु निःशस्र असतां त्यास मारणे हा युद्धधर्म नव्हे” असें कर्णानें म्हटल्यावर श्रीकृष्णानी द्रोपदीचे वृस्रहरण, किंवा सर्वांनी मिळून एकटया अभिमन्यूचा केलेला वध, वगैरे मागच्या गोष्टी काढून त्या हरएक प्रसंगीं तेव्हां गेला हेोता केठे राधासुता तुझा धर्म । असें कणीस विचारलें म्हणून महाराष्ट्रकवि मोरोपंत यांनी वर्णिले आहेः आणि महाभारतांतहि या प्रसंगीं “क्व ते धर्मस्तदा गतः” असा ‘धर्म’ शब्दाचाच प्रयोग असून, शेवटीं अशा प्रकारचे अधर्म करणारास जशास तसें या न्यायानें शासन करणेच योग्य असें दर्शविलें आहे. सारांश, संस्कृतांत काय आणि प्राकृतांत काय शिष्टांनीं हरएकबाबतींत अध्यात्मदृष्टया समाजधारणेसाठीं जे नीतिनियम घालून दिले आहत त्यांचा ‘धर्म’ या शब्दानें उल्लेख करण्याचा सर्वत्र परिपाठ असल्यामुळे तोच शब्द अम्हींाहि या ग्रंथांत कायम ठेविला आहे. समाजधारणेकरितां शिष्टांनीं घालून दिलेले आणि सर्वसंमत झालेले नीतीचे जे नियम, किंवा ज्यांस ‘शिष्टाचार' असेंहि म्हणतात, तेया दृष्टीनें धर्माचे मूळ होत; आणि म्हणूनच महाभारतांत (अनुः १९४. १५७) आणि स्मृतिग्रंथांत “आचारप्रभवो धर्मः” अथवा “आचारः परमो धर्मः” (मनु.१.१०८), किंवा धर्माचे मूळ सांगतांना “वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य चप्रियमात्मनः।” (मनु. २. १२),अशीं वचनें आलेली आहेत. परंतुकर्मयेोगशास्रांत एवढथानें निर्वाह लागत नसून, हा आचार प्रवृत्त होण्यास तरी काय कारण झाले असावें याचा पूर्ण व मार्मिक विचार करणे कसें जरूर पडते,हें मार्गे दुसच्या प्रकर ‘धर्म’ शब्दाची दुसरी जी एक व्याख्या प्राचीन ग्रंथांतून दिलेली असत्ये, तिचाहियेथे थोडा विचार केला पाहिजे. ही व्याख्या मीमांसकांची आहे.“चोदनालक्षणोऽर्थो धर्मः” असें ते म्हणत असतात (जै. सू. १. १. २), चोदना म्हणजे