पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/107

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ४ थे आधिभौतिक सुखवाद. दुःखादुद्विजते सर्वः सर्वस्य सुखमीप्सितम् ।* महाभारत शांति. १३९,६१. H蠶 शास्रकारांनी “अहिंसा सत्यमस्तेयं” इत्यादि नियम घालून देण्याचे कारण काय, ते नित्य आहेत का आनत्य आहेत, त्यांची व्याप्ति किती, अथवा त्यांतील मूलतत्त्व कोणतें, आणि यांपैकी दोन परस्परावरोधी धर्माची एककालींच प्राप्ति झाल्यास कोणता मागैस्वीकारावा,इत्यादिप्रश्नांचा“महाजनीयेन गतः स पन्थाः’ किंवा “अति सर्वत्र वर्जयेत्” अशा सामान्य युक्त्यांनी निभाव लागत नसल्यामुळे, या प्रश्नांचा योग्य निर्णय लागून श्रेयस्कर मार्ग कोणताहें ठरावण्यास कांहीं निश्चितं साधन आहे की नाहीं, अगर कोणत्या दृष्टीनें परस्परविरुद्ध धर्माचे लाघवगौरव किंवा कमीजास्त महत्त्व आपणास ठरावतां येईल, हें आतां पहावयाचे आह. इतर शास्रीय प्रतिपादनाप्रमाणें कर्माकर्मविवेचनाच्या प्रश्नांचाहि ऊहापोह करडयाचे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक असे तीन प्रकारचे मार्ग असूनू त्यांतील भेद काय हें गेल्या प्रकरणांत सांगितले आहे. आमच्या शास्रकत्येौंचे मतें या सर्वांत आध्यात्मिक मार्ग श्रेष्ठ होय. पण अध्यात्ममागीचे महत्त्व पूर्णपणे लक्षांत येण्यास दुस-या दोन मागाँचाहि विचार करणें अवश्य असल्यामुळे कर्माकर्मपरीक्षणाच्या आधिभौतिक मूलतत्त्वांची चर्चा या प्रकरणांत प्रथम केला आहे. ज्या आधिभौतिक शास्रांची अर्वाचीन काली अत्यंत वाढ झालेली आह त्यांत व्यक्त पदार्थाच्या बाह्य व दृश्य गुणांचाच विचार प्राधान्येंकरून कर्तव्य असते. म्हणून आधिभौतिक शास्रांच्या अध्ययनांतच ज्यांचे जन्म गेले आहेत, किंवा या शास्रांतील विचारपद्धतीचा ज्यांना आभमान आहे, त्यांना बाह्य परिणामांवाच विचार करण्याची नेहमी संवय लागत्ये; व त्यामुळे त्यांची तत्त्वज्ञानदृष्टि थोडीबहुत तरी संकुचित होऊन कोणत्याहि गोष्टीचे विवेचन करितांना आध्यात्मिक व पारलौकेिक, किंवा अव्यक्त व अदृश्य, कारणांस ते विशेष महत्त्व देत नाहीत. पणे अशा कारणास्तव अध्यात्म किंवा पारलौकिक दृष्टेि जरी सोडून दिली, तरी मनुष्यामनुष्यामधील जगांतला व्यवहार सुरळीत चालून लोकसंप्रह होण्यास नीतिनिर्वध

      • दु:खाचा सर्वासच कंटाळा असतो आणि सुख सर्वासच हवें असतें. ??