पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/119

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधिभौतिक सुखवाद くV9 उपयोग करण्यास अधिकारी कोण आणि ते याचा उपयोग केव्हाँ व कसा करतात, वगैरे मर्यादाहि त्याबरोबरच सांगितल्या पाहिजेत. नाहीपेक्षां आपण सकेिटिसासारखेच नीतिमतेचा निर्णय करण्यास समर्थ अाहों अशा प्रकारचा विनाकारण गैरसमज होऊन अर्थाचा अनर्थ होण्याचा संभव असतो. केवळ संख्येवरून नीतीचा योग्य निर्णय होत नाही, व पुष्कळांचेपुष्कळ सुख कशांत आहहें तकीनें ठरविण्यास निश्चित असें को४ातेंच बाह्य साधन नाहीं, या दोहॉखेरीज दुसरहि कांहीं मोठे आक्षेप या पंथावर येऊं शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या कृत्याच्या नुसत्या बाह्य परिणामावरूनच तं न्याय्य किंवा अन्याय्य आहे याचा पुरा व समाधानकारक निकाल करणेहि पुष्कळदां शक्य नसतें, असें थोड्या विचारान्ती सहज दिसून येईल. एखादें घड्याळ बरोबर वेळ दाखवितें कीं नाहीं एवढथावरून तें चांगलें किंवा वाईट याचा निर्णय करितात खरा; पण मनुष्याच्या कृतीस हा न्याय लावण्यापूर्वी, मनुष्य म्हणजे केवळ एखादें घड्याळ अगर थेत्र नव्हे हें आपण लक्षांत ठेविलें पाहिजे. सर्व सत्पुरुष जगाच्या कल्याणासाठी झटत असतात खरे; पण उलट जो कोणी लोकांच्या कल्याणासाठा झटतो तो प्रत्येक इसम साधुच असला पाहिजे असें निश्चयात्मक उलट अनुमान करितां येत नाहीं. मनुष्याचे अंतःकरण कसें आहे हेंहि पहावयास पाहिजे. यंत्र व मनुष्य यांमध्यें जेो मोठा भेद आहे ती हाच होय; आणि म्हणूनच अजाणतेपणानें किवा चुकीनें जर कोणाच्या हातून अपराध घडला तर तो कायद्यांत क्षम्य मानितात. तात्पर्थ, कोणतेंहि कृत्य चांगलें किंवा वाईट, धम्यै अगर अधम्र्य किंवा नीतीचें अगर अनीतीचे आहे, याचा खरा निर्णय त्या कृत्याचे केवळ बाह्य फल अथवा परिणाम-म्हणजे तें कृत्य पुष्कळांस पुष्कळ सुख देणारें आहे कीं नाहीं एवढेच-पाहून ठरवितां येत नाहीं. सदर कृत्य करणाराची बुद्धि, वासना किंवा हेतु कसा आहे हेंहि त्याबरोबरच अवश्य पहावें लागतें. अमेरिकेंत एका मोठया शहरांत सर्व लोकांच्या उपयोगाकरितां व सुखाकरितां ट्रामवे करावयाची होती; परंतु त्या कामास अवश्य लागणारी अधिकाच्यांची मंजुरी मिळण्यांत दिरंगाई होऊ लागली. तेव्हां ट्रामवेच्या व्यवस्थापकानें अधिकायांस पैसे भरल्यावर सदर मंजुरी ताबडतोब मिळाली, व लवकरच ट्रामवचें काम पुरें होऊन शहरच्या सर्व लोकांची त्यामुळे फार सोय व फायदा झाला. नंतर कांहीं दिवसांनी लांचाची गोष्ट उघडकीस येऊन व्यवस्थापकावर फौजदारी खटला करण्यांत आला. पहिल्या ज्यूरीत(पंचांत)एकमत होईना म्हणून दुसरी ज्यूरी निवडून दिली; व त्या ज्यूरीनेंदोषी ठरविल्यावर व्यवस्थापकास शिक्षा झाली. या ठिकाणीं पुष्कळ लोकांचे पुष्कळ सुख एवढेच नीततत्त्व घेऊन निभाव लागत नाहीं; लांच दिल्यामुळे ट्रामवेझाली हा बाह्य परिणाम पुष्कळांना पुष्कळसुखदेणारा होता