पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/127

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ५ वें सुखदुःख विवेक, सुखमात्यंतिकं यत्तत् वुद्विग्राह्यमतींद्रियम् ।। * गीता ६. २१. या जगांतील प्रत्येक मनुष्य सुख कसें मिळेल किंवा प्राप्त झालेल्या सुखाची वृद्धि कशी होईल, आणि दुःख कसें टळेल अथवा कमी होईल,यासाठीं सदैव धडपड करीत असतो, हा सिद्धान्त आमच्या शास्रकारांस मान्य आहे. “इह खलु अमुष्मिश्च लोके वस्तुप्रवृत्तयः सुखार्थमाभधीयन्ते । न ह्यतःपरं त्रिवर्गफलं विशिष्टतरमास्त ।”-या जगांत किवा परत्र सर्व प्रवृत्ति सुखाकरितां आहे, धर्मार्थकामाचे यापलीकडे दुसरें कांहीं फल नाहीं, असें शान्तिपवीत भृगुभरद्वाजास सांगत आहे (मभा. शां. १९०.९ ). परंतु आपलें खरें सुख कशांत आहे हें समजत नसल्यामुळे खोटें नाणें पद्रांत बांधून तेंच खरें आहे या समजुतीनें, किंवा आज नाहीं तर उद्यां तरी सुख मिळेल या आशेवर, मनुष्य आयुष्याचे दिवस कंठीत असतां मृत्यूनें जरी त्याजवर अकस्मात् घाला घातला, तरी त्यानें दुसरा सावध न होतां पुनः तोचकित्ता गिरवति असतो; आणि अशा रीतीनें हें भवचक चालू असून खरें व नित्य सुख कोणतें याचा कोणीच विचार करीत नाही, असें या शास्रकारांचे म्हणणे आहे. संसार केवळ दुःखमय आहे,किंवा सुखप्रधान अगर दुःखप्रधान आहे,याबद्दलपौरस्त्य व पाश्चात्य तत्त्वज्ञानी पुरुषांमध्यें बराच मतभेद आहे. परंतु यांपैकी कोणताहि पक्ष घेतला तरी प्रत्येक मनुष्यानें आपल्या दु:खाचें अत्यंत निवारण करून अत्यंतसुखप्राप्ति करून धणें यांत त्याचे कल्याण आहे, याबद्दल कोणाचाहि मतभेद नाहीं. ‘सुख' या शब्दाऐवजीं प्रायः ‘हित’, ‘श्रेय' किंवा ‘कल्यर्णि' हे शब्द अधिक वापरङयांत येत असतात; व त्यांमधील भेद काय हें पुढे सांगण्यांत येईल. तथापि ‘सुख’ शब्दांतच सर्व प्रकारच्या सुखांचा अगर कल्याणाचा समावेश होतो असें मानिल्यास सामान्यतः प्रत्येकाचा प्रयत्न सुखासाठी असतो हेंमतसर्वोसच ग्राह्य आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं. परंतुतेवढ्यामुळे “यदिष्टं तत्सुखं प्राहुः द्वेष्यं दुःखमिहेष्यते”-जें कांहीं आपणांस इष्ट असतें तें सुख आणि आपण ज्याचा द्वेष करितों म्हणज जें कांहीं आपणांला नकोसें असतें तें दुःख,-असें सुखदुःखांचें जें लक्षण

    • 'जें केवळ बुद्धीनेंच ग्राह्य असून इंद्रियातीत असतें तेंच आत्यंतिक सुख होय.??