पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/128

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*、ミ गीतारहस्य अथवा कर्मयेोग हाभारतान्तर्गत पराशरगीतंत केले आहे (मभा. शां.२९५.२७), तें शास्रदृष्टया पूर्ण निर्देष होत नाही. कारण, या व्याख्येंतील ‘इष्ट' शब्दाचा अर्थ इष्ट वस्तु किंवा पदार्थ असाहेि होऊं शकेल: आणि असा अर्थ धरिला तर इष्ट पदार्थासहेि सुख म्हणण्याचा प्रसंग प्राप्त होईल. उदाहरणार्थ, तहान लागली असतां आपणांस पाणी जरी इष्ट आहे, तरी पार्णा या बाह्य पदार्थास ‘सुख 'हें नांव देतां यत नाहीं. तसें होईल तर नदीच्या पाण्यांत वुडणारा मनुष्य सुखांत बुडीला असें म्हणावें लागेल. पाणी पिण्यानें जी इंद्रियतृप्ति होत्ये तें सुख होय. ही इंद्रियतृप्ति किवा सुख मनुष्याला हवेंसें वाटतें हें खरें; पण त्यामुळे जें जें हवेंसें वाटतं तें तें सर्व सुखच असलें पाहिजे, असा व्यापक सिद्धान्त करितां येत नाही. म्हणून नैय्यायिकांनी “ अनुकूलवेदनयिं सुख'-जी वेदना आपल्याला अनुकूल असत्ये तें सुख, आणि “ प्रतिकूलवेदनीयं दुःखं”-जी वेदना आपल्याला प्रतिकृल तें दुःख, अशा व्याख्या देऊन सुख व दुःख या एक प्रकारच्या वेदना ठरावल्या आहत. या वेदना मूळच्या म्हणजे जन्मतःच सिद्ध आणि केवळ अनुभवगम्य असल्यामुळे नय्यायिकांच्या या व्याख्येपेक्षां सुखदुःखांचे जास्त चांगलें लक्षण सांगतां येणे शक्य नाहीं. ही वेदनारूप सुखदुःखे केवळ मनुष्याच्या व्यापारांनीच उद्भवतात असें नाहीं; तर कधी कधी कांहीं देवतांच्या कॉपामुळेहि दुर्धर रोग उद्भवून त्यांचे दुःख मनुष्यास भोगावें लागतं. म्हणून वेदान्तग्रंथांतून सामान्यतः या सुखदुःखाचे आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक असे तीन भेद करीत असतात. पैकीं देवतांच्या प्रसादानें किंवा कोपानें जीं सुखदुःखें अनुभवावी लागतात त्यांस'आधिदैविक'ही संज्ञा असून, बाह्यसृष्टीतील पृथिव्यादि पंचमहाभूतात्मक पदार्थाचा मनुष्याच्या इंद्रियांशी संयोग होऊन शीतोष्णादिकांमुळे जा सुखदुःखे होतात त्यांस ‘आधिभौतिक' हें नांव देतात; आणि अशा प्रकारच्या बाह्य संयोगावांचून उद्भवणाच्या इतर सर्व सुखदुखांस ‘आध्यात्मिक' असे म्हणतात. सुखदुःखांचे हें वर्गीकरण स्वीकरिलें म्हणजे शरीरांतल्याच वातपित्तूदि दोषांचे प्रमाण बिघडून उद्भवणारीं ज्वरादि दुःखें, आणि तेंच प्रमाण बरोबर असतां अनुभवास येणारें शरीरप्रकृतीचे स्वास्थ्य, यांची गणना आध्यात्मिकसुखदुःखांत करावी लागत्ये.कारण,हीं सुखदुःखजूरी पंचभूतात्मकस्थूल शरीरांतील म्हणजे शारीर असली तरी शरीराबाहेरॉल पदार्थाच्या संयोगामुळे ती उद्भवली आहेत असें नेहमी म्हणतां येत नाहीं; व त्यामुळे आध्यात्मिक सुखदुःखांतहि शारीर व मानसिक असा वेदान्तदृष्टया पुनः भेद करावा लागतो. पण सुखदुखांचे शारीर व मानसिक असे जर याप्रमाणें भेद केले तर आधिदैविक सुखदुःखे निराळीं मानण्याची जरूर रहात नाहीं. कारण, देवतांच्या प्रसादानं किंवा कोपानें होणारीं सुखदुःखेहि मनुष्यास अखेर आपल्या शरीरानं किंवा मनानेंच भोगावी