पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/133

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःखविवेक ‘ e तर सुख हें सत्त्वाचे आणि तृष्णा हें रजाचे लक्षण म्हटलें असून (गी. १४.६,७), सत्त्व आणि रज हे गुण पृथक् धरिले आहेत. यावरूनहि सुख आणि दुःख या दोन एकमेकांच्या प्रतियोगी पण निरानराळ्या दोन वृत्ति भगवद्गीतेंत मानिल्या आहेत असें स्पष्ट होतें. अठराव्या अध्यायांत “कोणतेंहि कृत्य दुःखकारक आहे म्हणून तें सोडिल्यानें त्यागफल मिळत नाही, हा त्याग राजस होय” (गी. १८.८), असा जो राजस त्यागाचा कमीपणा दाखावला आहे तोहि, सर्व सुख तृष्णाक्षयमूलकच आह, या सिद्धान्ताच्या विरुद्ध आहे. सर्व सुख तृष्णाक्षयरूप किंवा दुःखाभावरूप नसून सुख आणि दुःखया दोन स्वतंत्र वस्तु आहत असें जरी मानिले, तरी या दोन्ही वेदना परस्परविरुद्ध किंवा प्रतियोगी असल्यामुळे ज्याला दुःखाचा यत्किचितहि अनुभव नाहीं त्याला सुखाची गोडी कळणे शक्य आहे की नाहीं, असा या पुढला दुसरा प्रश्न आहे. कित्येकांचे असे म्हणणें आहे की, दुःखानुभव प्रथम आलेला असल्याखेरीज सुखाची गोडी कळणेच अशक्य होय. उलट पक्षीं स्वर्गातील देवांच्या नित्यसुखाचा दाखला देऊन दुसरे पंडित असें प्रतिपादन करितात कीं, सुखाची गोडी कळण्यास दुःखाचा पूर्वानुभव असण्याची जरूर नाहीं. कोणताहि खारट पदार्थ पूर्वी चाखिल्याखेरीज मध, गुळ,साखर,आंबा,कॅळे इत्यादि पदार्थाची निरनिराळी गोडी ज्याप्रमाणें अनुभवितां येत्ये, तद्वत् सुखाचेहि अनेक प्रकार असल्यामुळे पूर्वीच्या दुःखानुभवाखेरीज काप पर्याय करून वीट न यतां सुखाचा सदैव अनुभव घेणे अशक्य नाहीं. परंतु या जगांतील व्यवहार पाहिला तर हा वादच निरर्थक आहे, असें दिसून येईल. पुराणांतून देवांसहि संकटं प्राप्त झाल्याचीं पुष्कळ उदाहरणे असल्यामुळे व स्वर्गसुखहि पुण्यांश सरल्यावर कालान्तरानें नाहींसें होत असल्यानें स्वगींच्या सुखाचा दृष्टांत समर्पक नाही; आणि समर्पक असला तरी स्वर्गातला दाखला आमच्या काय उपयोगी ? “नित्यमेव सुखं स्वर्गे” हें जरी खरें मानिले, तरी यापुढेच “सुखं दुःखमिहोभयम्” (मभा.शां. १९०.१४)-या जगांत सुख व दुःख दोन्ही मिश्रित अस| आणि ಸ್ಟ್ಗ ** जगीं सर्व असा । विचारी मना तूंचि शोधून पाहे।” असा आपला अनुभव ': ** खेन साध्वी लभते सखानि सुख न जातु लभ्यै दुःखेन साध्वी लभते सुखानि । “सुखानें सुख कधी मिळत नाहीं: साध्वीला सुखें प्राप्त होण्यास दुःख किंवा कष्ट सोसावे लागतात”(मभा.वन२३३.४), असा जो द्रौपदीनें सत्यभामेसउपदेशकेला आहे तोहि या लोकींच्या अनुभवाप्रमाणे सत्य आहे असे म्हणावें लागतें. कारण,