पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/134

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० २ गीतारहरूथ अथवा कर्मयोग जांभूळ ऑठावर पडलें तरी तें तोंडांत घालावें लागतें आणि तोंडांत पडलें तरी तें सुखांतील गोडी, यांमध्यें पुष्कळ अंतर असतं. कारण, नित्य सुखोपभोगानें सुखाचा अनुभव घेणाच्या इंद्रियशक्तीची तीव्रताहि मंदावते प्रायेण श्रीमतां लोके भोसं शक्तिर्न विद्यत । काष्ठ(न्यपि हि जीर्यन्त दरिद्राणां च सर्वशः ॥ “श्रीमंतांना सुग्रास अन्नाचे सवन करण्याची हि प्रायः शक्ति नसत्ये आणि गरीबाला लांकडें देखील सबंध पचनी पडतात” (मभा. शां.२८,२९), ही गेोष्ट प्रसिद्ध आहे. म्हणून इहलेोकीचाच विचार कर्तव्य असतां दुःखाखेरीज सुख नेहमीं अनुभवितां येईल की नाही, या प्रश्नाचा जास्त खल करीत बसण्यांत कांहीं हांशील नाहीं. ‘‘सुखस्यानन्तरं दुःखं दुखस्यानन्तरं सुखम” (वन.२६०.४९. शां. २५.२३)सुखापाठीमागें दु:ख आणि दुःखापाठीमागें सुख लागलेलेंच आहे: किंवा कालिदासानें मेघदूतांत (मू.११४) वर्णन केल्याप्रमाणे कस्यैकांर्त सुखमुपनतं दुःखमेकांततेो वा । नीचैर्गच्छत्यपरि च दशा चक्रनेमिक्रमेण ॥ “कोणालाहि नेहमीच सुख किवा नेहमीच दुःख अशी स्थिति येत नसून सुखदु:खाची दशा चाकाच्या धांवेप्रमाणें एकसारखी खालीं वर होत असत्ये,’ हा कम सदैव चालू आह. मग हें दुःख आमच्या सुखाची गोडी वाढविण्याकरितां निर्माण झालेलें असो, किंवा प्रकृतीच्या संसारांत त्याचा दुसरा कांहीं उपयोग असो. वीट नं यतां विषयसुखोपभोगच नित्य एकसारखा मिळणे अगदी असंभवनीय नसेल; पण दुःख अजीबात नाहीसें होऊन केवळ सुखच सदैव अनुभविणें निदान या कर्मभूमात तरी शक्य नाही. ہحیٰی जगांतील व्यवहार केवळ सुखमय नसून नेहमीच जर सुखदुःखात्मक आहे, तर संसारांत सुख अधिक का दुःख आधक हा तिसरा प्रश्न पुढे क्रमानेंच निष्पन्न होते. आधिभौतिक सुख हेंच परम साध्य मानणाच्या पाश्चात्य पंडितांपैकीं पुष्कळांचे असं म्हणणें आहे की, संसारांत सुखापेक्षां दुःखच जर आधक असतं तर संसारांत राहण्याच्या भानगडीत न पडतां, सर्वानी नाहीं तरी त्यांपैकीं बन्याच जणांनी आत्महत्या केली असती. परंतु आयुष्याला ज्या अर्थी मनुष्य कंटाळलेला दिसत नाहीं त्या अर्थी संसारांत त्याला दुःखापेक्षां सुखच आधक उपभोगावयास मिळत असलें पाहिजे; आणि म्हणून सुख हेच सर्वाचे परम साध्य कल्पून धर्माधर्माचा निर्णयहि याच मापानें केला पाहिजे, परंतु आत्महत्येचा संसारसुखाशी जोडलेला हा संबध