पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/136

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ र्गातारहस्य अथवा कर्मयोग उद्यो. ५.१ व २); आणि याच न्यायानें चौच्यांशीं लक्ष योनीत नरंदहश्रेष्ठ, नरांत मुमुक्षु व मुमुक्षूत सिद्ध असें प्राकृत ग्रंथांतूनहि म्हटलेले आहे. “ सबसे जीव प्यारा” अशी जी म्हण आहे त्यांतील तात्पर्यहि हेंच असून, याच कारणास्तव संसार दुःखमय असला तरी कोणीं आत्महत्या केल्यास त्यास लोक वेडा व धर्मशाखें पापी समजतात (मभा.कर्ण.७०.२८); आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणें हा कायद्यांत गुन्हा धरिला जातो. मनुष्य आत्महत्या करीत नाहीं यावरून संसाराच्या सुखमयत्वाचे अनुमान काढणें रास्त नाही असें याप्रमाणें सिद्ध झाल्यावर संसार सुखमय का दुःखमय या प्रश्नाचा निर्णय करण्यास पूर्वकर्माप्रमाणें एकदां पदरांत पडलेलें नरदेहप्राप्तीचे नैसर्गिक भाग्य बाजूला ठेवून तदुत्तरकालीन म्हणजे केवळ संसारांतल्या गोष्टींचाच आपणांस विचार केला पाहिजे. मनुष्य जीवदेत नाहीं किंवा जिवंत राहतो, हें संसाराच्या प्रवृत्तीचे कारण आहे; आधिभौतिक पंडित म्हणतात त्याप्रमाणें संसारांतील सुखाधिक्याचा पुरावा नव्हे. किंवा हाच अर्थ दुसच्या शब्दांनी व्यक्त करणें झाल्यास असें म्हटले पाहिजे कीं, जीव न देण्याची बुद्धि नैसर्गिक आहे, संसारांतील सुखदुःखांच्या तारतम्यानें उत्पन्न झालेली नव्हे; व म्हणूनच संसार सुखमय आहे ही गोष्ट त्यावरून सिद्ध होऊं शकत नाहीं. केवळ मनुष्यजन्माचे महद्भाग्य आणि त्यापुढला मनुष्याचा संसार यांची भ्रामक मिसळ न करितां, मनुष्यपण व मनुष्याचा संसार म्हणजे नित्य व्यवहार, हीं दोन्ही निरनिराळी केल्यावर श्रेष्ठ नरदेहधारी प्राण्याला संसारांत सुख अधिक का दुःख अधिक या प्रश्नाचा निकाल लावण्यास प्रत्येक मनुष्याच्या“प्रस्तुतच्या'वासनांपैकीं किती वासना सफल आणि किती निष्फल होतात, हें पाहण्याखेरीज दुसरे साधन रहात नाहीं. ‘प्रस्तुतच्या’ असें म्हणण्याचे कारण असें की, ज्या गोष्टी सुधारलेल्या स्थितीत सर्वांनाच प्राप्त झालल्या असतात त्या नित्य व्यवहारांतल्या होऊन त्यांतील सुख आपण विसरून जातों; आणि ज्या वस्तूंची गरज नवी उत्पन्न होत्ये त्यांपैकी कोणत्या प्राप्त होतात तें पाहून तेवढ्यावरूनचे संसारांतील सुखदुःखाचा निर्णय करीत असतों. वर्तमानकाली आपणांस किती सुखसाधनें उपलब्ध आहत आणि शंभर वर्षांपूर्वी यांपैकीं किती सुखसाधनें प्राप्त झालेली होर्ती यांची तुलना करणे, आणि आजच्या मितीस मी सुखी आहं कीं नाहीं याचा विचार करणे, या प्रवासापेक्षां सध्यांच्या आगगाडीचा प्रवास पुष्कळ सुखकारक आहे, हें कोणीहि कबूल करील. पण आगगाडीच्या सुखाचे हें सुखत्व आतां आपण विसरली असून, एखाद्या दिवशी गाडीला उशीर होऊन टपालांतील पत्र मिळण्यास जरा विलेब लागला म्हणजे त्याचे आपणांस वाईट वाटतें. म्हणून उपलब्ध झालेलीं सुखसाधनें