पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/139

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखदुःख विवेक * eve बाळगूणें व्यर्थ होय. प्राचीन काळीं सुख किती होतें याचा विचार करितांना या अपूर्णोकाच्या अंशस्थानाचाच आपण स्वतंत्र विचार करीत असून अंशापेक्षां छेद जास्त वाढला आह इकडे लक्ष देत नाहीं. परंतु काळाची अपेक्षा न ठेवितां मनुष्यप्राणी सुखी का दु:खी एवढ्याचाच जेव्हां निर्णय करणें आह तेव्हां अंश व छेद या दोहींचाहि विचार करणें जरूर आहे; आणि मग हा अपूर्णाक कधीहि पूर्ण होणें शक्य नाही असें नजरेस येतें. ** न जातु कामः कामानां ” या मनुवचनाचा ( २. ९४) इत्यर्थहि हाच आहे. सुखदुःखें मोजण्यास उष्णतामापक यंत्रासारखें काही निश्चित साधन नसल्यामुळे सुखदुःखांच्या तारतम्याची गाणतरीत्या केलेली ही मांडणी कित्येकांस मान्य होणार नाही. परंतु त्या कोटिक्रमानें संसारांत मनुष्यास सुख अधिक आहे हें सिद्ध करण्यासहिं कांही मोजमाप रहात नाही. म्हणून उभयपक्षा साधारण अशा या आक्षेपानें वरील उपपादनांतील सामान्य सिद्धान्तासम्हणजे सुखोपभोगापक्षां सुखेच्छेच्या अनावर वाढीमुळे सिद्ध होणाच्या सिद्धान्तास-कोणताहेि बाध येऊं शकत नाहीं. स्पेन देशांत मुसलमानी राज्य असतां तिसरा अबदुल रहमान* नांवाच्या तेथीलएका न्यायी व पराक्रमी बादशहानें आपले दिवस कसे जातात याची रोजनिशी ठेविली होती, व त्यावरून अखेर पहातां पन्नास वर्षोच्या त्याच्या राज्यकारकीर्दीत फक्त चवदाच दिवस पूर्ण सुखाचेगेल्याचे त्यास आढळून आलें, असें मुसलमानी इतिहासांत म्हटले आहे; आणि जगांतील व विशषतः युरोप खंडांतील प्राचीन व अर्वाचीन तत्त्वज्ञांची मतें पाहिलीं तरसंसार सुखमय म्हणणाच्यांची संख्या आणि संसार दु:खमय म्हणणाच्यांची संख्या या दोन्ही बरोबर असल्याचे दिसून येतें, असें एकानें लिहिले आहे. या संख्यांतच हिंदुतत्त्व ज्ञांच्या मतांची भर घातल्यावर पारडें कोणीकडे झुकेल हें सांगावयास नको. संसारांतील सुखदुःखांचे वरील निरूपण ऐकून कोणी संन्यासमार्गी पुरुष पुनः असा प्रश्न करील की, “सुख हा वास्तविक पदार्थ नसल्यामुळे तृष्णात्मक सवै कर्म सोडिल्याखेरीज शांति नाही, ” हें म्हणणें जरी तुम्हांस मान्य नसलें तरी तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तृष्णेपासून असंतोष व असंतोषापासून पुढे जर दुःख होतं, तर निदान ह असंतोष दूर करण्यासाठी तरी मनुष्यानें तृष्णा व तृष्णेबरोबर सर्व सांसारिक कर्माचा-मग तैा परोपकारासाठी असोत वा स्वार्थाप्रीत्यर्थ असोतत्याग करून सदैव संतुष्ट रहावें असें म्हणण्यास हरकत काय ? महाभारतांतच संतेोष हेंच परम सुख आहे-अशीं वचनें असून (मभा. वन. २१५. २२)

  • Moors in Spatn, p. 128. (Story ct the Nations Series). t Macmillan's Promotion of Happiness, p. 26.