पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/33

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

:श्रीगणेशाय नम: |

ओम तत्सत,

श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र.


प्रकरण १ लें. विषयप्रवेश.
नारायणं नमस्कृत्य नरं चैवं नरोत्तमम् । देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ॥*
महाभारत, आदिम स्प्लेो क.

c, f¥मद्भगवद्गीता हा आमच्या धर्मग्रंथांपैकी एक अत्यंत तेजस्वी व निमैल हिरा आहे. पिंडब्रह्मांडज्ञानपूर्वक आत्मविद्येचीं गूढ व पवित्र तत्त्वें थेोडक्यांत पण असंदिग्ध रीतीनें सांगून त्यांच्या आधारें मनुष्यमात्रास आपल्या आध्यात्मिक पूर्णावस्थेची म्हणजे परम पुरुषार्थाची ओळख करून देणारा, आणि त्याबरोबरच भक्तीची ज्ञानाशी व अखेर या दोहॅींचीहि शास्रतः प्राप्त होणाच्या व्यवहारांशीं सोपपत्तिक व सुंदर जेोड घालून संसारांत भांबावून गेलेल्या मनास शांत आणि विशेषतः निष्काम कर्तव्याचरणास प्रवृत्त करणारा, यासारखा दुसरा बालबोध ग्रंथ संस्कृतांतचं काय पण जगांतीलइतर वाङ्मयांतहिसांपडणें दुर्मिळ होय. केवळ काव्य या दृष्टीनें जरी याचे परीक्षणकेले, तरी आत्मज्ञानाचे अनेक गहन सिद्धान्त प्रासादिक भाषेने आबालवृद्धांस सुगम करणारा आणिज्ञानयुक्त भक्तिरसानें भरलेला हा ग्रंथ उतम काव्यांत गणिला जाईल. मग सकलवैदिक धर्माचे सारश्राभगवंताचे वाणीनें ज्यांत सांठविलेंगेलें त्याची योग्यता काय वर्णावी ? भारतीय युद्ध समाप्त होऊन श्रीकृष्ण व अर्जुन प्रेमानें गोष्टी बोलत बसले असतां भगवंतांचे मुखानें गतिा पुनः ऐकण्याच्या इच्छेनें अर्जुनानें एक * “नारायणाला, नरांमध्ये उत्कृष्ट जो नर त्याला, सरस्वती देवीला आणि व्यासाला नमस्कार करून मग जय भ्हणजे महाभारत म्हणण्यास सुरुवात करावी,’ असा या श्लोकाचा अथै आहे. नर व नारायण हे दोन ऋषि म्हणजे द्विधा झालेला साक्षात् परमात्माच असून गीता र. १