पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/43

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रवेश. ११ आहे. पण या समर्थनाबरोबर भागवतधर्मातलि भक्तीचे रहस्य जसे दाखवावयास पाहिजे होतें तसें दाखविण्यास व्यास तेव्हां विसरले, भक्ताखेरीज नुसतें नैष्कम्यै म्हणजे निष्काम कर्म फुकट आह (भागवत १.५.१२), असें वाटून भारतातील ही उणीव भरून काढण्यासाठं भागवतपुराण मागाहून मुद्दाम सांगावें लीगलें, असें भागवताच्या आरंभीच्या अध्यायांतून वर्णन आह, भागवतपुराणाचा मुख्य हेतु काय हें यावरून उघड होतें; व यामुळे अनेक प्रकारच्या हरिकथा सांगून भागवतधर्मतील भगवद्भक्तीचें माहात्म्य भागवतांत जसें विस्तारानें वर्णिले आहे तसें भागवतधर्माच्या कर्मपर अंगांचे विवेचन त्यांत झालेले नाही. किंबहुना सर्व कर्मयोग भक्तावांचून रद्द होत, असे भागवतकारांचे म्हणणें आह (भाग. १.५.३४). म्हणून गोतेचे तात्पर्य ठराविण्यास,गतिा ज्या भारतांत सांगितला आहे त्यांतल्याच नारायणीयेोपाख्यानाचा जसा उपयोग होतो, तसा भागवतपुराण भागवतधर्मींथ असलें तरी तें केवळ भाक्तिप्रधान असल्यामुळे त्याचा होऊं शकत नाही, अििण ताकेला तरी भारत व भागवत या दोन ग्रंथांचे उद्देश व कालहिं भिन्न आहत हे लक्षांत ठेवून करावा लागतो, हें येथे सांगितले पाहिजे. निवृतिपर यतिधर्म आणि प्रवृतिपर भागवतधर्म यांची मूळ स्वरूपें कोणती, हे भद होण्थास कारणें कॉथ झाला, मूळ भागवतधर्माचे सध्यां कोणतें रूपांतर झालेले आहे, इत्यादि प्रश्नांचा विचार पुढे खुलासेवार करण्यांत येईल. खुद्द महाभारतकारांच्या मतें गीतेचें तात्पर्थ काय ते सांगितले. आतां गीतेवरील भाष्यकार व टीकाकार यांनी गीतेचें तात्पर्य काय ठरावलें अहि तें पाहूं. ही भाषेयं व टीका थांमध्यें श्रीशंकराचार्याचे गीतेवरील भाषथ हा सध्यां अतिप्राचीन ग्रंथ समजतात. यापूर्वी गीतेवर बरीच भाष्यं किंवा टीका झालेल्या होत्या यांत संशय नाही; परंतु या टीका सध्यां उपलब्ध नसल्यामुळे महाभारतानंतर व शंकराचार्याचा उदय होण्यापूर्वी दरम्यानच्या काळांत गीतेचा अर्थ कसा लावीत असतहें समजण्यास आतां पुरीं साधनं उरलीं नार्हति. तथापि शांकरभाष्यांतच या प्राचीन टीकाकारांच्या मतांचा जेो उल्लेख आहे (गी. शांभा. अ. १ व ३ यांचा उपोद्घात पहा), त्यावरून आचार्याच्या पूर्वीच्या टीकाकारांनी गीतेचा अर्थ महाभारतकारोंप्रमाणे ज्ञानकर्मसमुचयात्मक-म्हणजे ज्ञानाबरोबरच ज्ञानी मनुष्यानें आमरणान्त स्वधमक्ति कर्म केले पाहिजे-असा प्रवृतिपर लाविलेला होता, असें उघड दिसून येतें. पण वैदिक कर्मयोगाचा हा सिद्धान्त श्रीशंकराचार्याँस मान्य नसल्यामुळे तो खोडून काढून आचार्याच्या मतें गीतेचे तात्पर्य काय हें सांगण्याच्या हेतूनेंच गीतेवर त्यांनी आपलें भाष्य मुद्दाम लिहिलें, असें सदर भाष्याच्या आरंभीच्या उपोद्घातांत स्पष्ट म्हटलें आहे. किंबहुना ‘भाष्य' या शब्दाचाच असा अर्थ होतो. ‘भाष्य' व'टीका'या दोन