पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/57

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रवश. २५ पातक घडणार आणि न करावी तर क्षात्रधर्मास अंतरणार, अशा रीतीनें एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर दिसूंलागल्यावर दोन एडक्यांच्या टकरीत सांपडणाच्या एखाद्या गरीब प्राण्याप्रमाणे अर्जुनाची अवस्था झाली ! एवढा मोठा योद्धा खरा; पण धमीधमीच्या त्या नैतिक सांपळ्यांत अकस्मात् सांपडल्यावर त्याचे तोंड कोरडें पडलें, अंगावर रोमांच उभे राहिले, हातचे धनुष्य गळाले व “ मी नाहीं लढणार” म्हणून रडत आपल्या रथांतच तो मट्टदिशी खाली बसला ! आणि ओखर, लांबच्या क्षत्रियधर्मावर, मनुष्यास स्वभावतःच जास्त प्रिय वाटणाच्या ममत्वाचा-म्हणजे जवळच्या बंधुस्रहाचा-पगडा बसून मोहानें तो असें म्हणू लागला कीं, पितृवध, गुरुवध, बंधुवध, सुहृद्वध, किबहुना सबंध कुलक्षय, असलीं घोर पापें करून राज्य मिळविण्यापेक्षां पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षा मागणें कुाय वाईट ? शूढूंनी या वेळीं मला निःशस्र पाहून माझा गळा कापला तरी बेहेत्तर आहे; पण लढाईतं स्वकीयांचा वध करून त्यांच्था रक्तानें विटाळलेले व अभिशापानें ग्रस्त झालेले भोग मी उपभोगू इच्छीत नाहीं ! क्षात्रधर्म झाला म्हणून काय झालें ? त्यासाठीं पितृवध, बंधुवध व गुरुवध अशीं भयंकर पातकं जर करावी लागणार तर जळे तो क्षात्रधर्म आणि आग लागो त्या क्षात्रनीतीस ! प्रतिपक्षास या गेोष्टी कळत नसून त दुष्ट झाले असल तरी मींहि तसेंच वागणें युक्त नाहीं. माझ्या आत्म्याचे खरेंकल्याण कशांत आहे तें मला पाहिलें पाहिजे; आणि माझ्या मनाला जर असलीं घोर पातकं करणे श्रेयस्कर वाटत नाहीं, तर क्षात्रधर्म कितीहि शास्रोक्त असला तरी अशा प्रसंगी मला तो काय होय ? याप्रमाणे त्याचे मन त्याला खाऊं लागल्यामुळे“धर्मसंमूढ'होऊन म्हणजे केोणता कतैव्यधर्म पत्करावा हें सुचेनासें होऊन श्रीकृष्णास शरण गेल्यावर भगवंतांनीं त्याला गीता उपदेशून ताळ्यावर आणिलें; आण युद्ध करणें तत्काली त्याचे कर्तव्य असतांहि भीष्मादिकांचे त्यांत वध होतील या भीतीनें युद्धापासून पराङ्मुख होऊं पहाणाच्या अर्जुनास तेंच युद्ध स्वेच्छर्ने करावयास लाविलें.गीतेंतील उपदेशाचे रहस्य जर आपणास काढावयाचे असेल तर तें या उपक्रमेापसंहारास व फलास धरून असले पाहिजे. भक्तीनें मेोक्ष कसा मिळवावा, किंवा ब्रह्मज्ञानानें अगर पातंजल येोगानें ती सिद्धि कशी प्राप्त करून घ्यावी, इत्यादि निव्वळ निवृत्तिपर मार्ग किंवा फक्त कर्मत्यागरूप संन्यासधर्महि या ठिकाणीं सांगण्याचे कांहीं प्रयोजन नव्हतें.श्रीकृष्णाचे मनांतून अर्जुनास संन्यास देऊन वैराग्यानें भिक्षा मागत वनांत, किंवा कौपीन धारण करून व निंबाचा पाला खाऊन आमरणान्त योगाभ्यास करण्यासाठीं हिमालयावर पाठवावयाचे नव्हतें. अथवा धनुष्यबाणांऐवजीं हातांत टाळ, मृदंग आणि वीणा देऊन त्यांच्या भूमीवर भारतवर्षाय सकल क्षात्रसमाजापुढे बृहन्नलप्रमाणे अर्जुनास पुनश्च नृत्य कर