पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/6

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ गीतारहस्य अथवा कर्मयोग केल्यानें या विषयाचा अधिक ऊहापोह होईल व खरं काय याचा निर्णय करण्याला सोयीचे पडेल, अशा बुद्धीनें यूा विषयावर चारपांच ठिकाणीं निरनिराळ्या वेळीं जाहीर व्याख्यानं दिली. यांपैकी एक व्याख्यान नागपुरास सन १९०२ सालच्या जानेवारीत व दुसरें जगद्गुरु श्रीशंकराचार्य मठ करवीर व संकेश्वर यांच्यासमोर त्यांच्याच आज्ञवरून संकेश्वरमठांत सन १९०४ सालच्या आगस्ट महिन्यांत झालेलें असून, नागपूर येथे दिलेल्या व्याख्यानाचा गोषवाराहि तेव्हां वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेला आहे. याशिवाय याच हेतूनें सवडीप्रमाणें कांही विद्वान मित्रांबरोबर खासगी रीतीनें वेळोवेळी वादविवादहि केला. या मित्रांपैकींच कै० श्रीपतिबुवा भिंगारकर हे एक होते. यांच्या सहवासानें भागवत संप्रदायांतील कांहीं प्राकृत ग्रंथ पहाण्यांत येऊन, गीतारहस्यांत वर्णिलेल्या कांहीं थोड्या गोष्टी बुवांच्या व आमच्या वादविवादांतच प्रथम निश्चित झालेल्या आहेत. बुवा हा ग्रंथ पहाण्यास राहिले नाहींत ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. असेो; अशा तच्हेनें गीतेंतील प्रतिपाद्य विषय प्रवृत्तिपर आहे हें मत कायम होऊन, व तें लिहून काढण्याचे ठरूनहि, बरीच वर्षे झाली. पण हल्लीं उपलब्ध होणारीं भाष्यें, टीका किंवा भाषान्तरें यांत न स्वीकारिलेले हें गीतातात्पर्य, नुस्तें म्हणजे पूर्वीच्या टीकाकारांनीं ठरविलेलें तात्पर्य आम्हांस कां प्राह्य नाही याची कारणें न दाखवितां, पुस्तकरूपानें प्रसिद्ध केल्यास पुष्कळ गैरसमज होण्याचा संभव होता; आणि सर्व टीकाकारांच्या मतांचा संग्रह करून त्यांर्ताल अपुरेपणा सकारण दाखविण्याचे, आणि गीताधर्माची इतर धर्माशं किवा तत्त्वज्ञानांशी तुलना करण्याचे, काम ब-याच प्रयासाचे असल्यामुळे, तेंहि थोडक्या कालांत नीट उरकण्यासारखे नव्हतें. म्हणून आम्ही गीतेवर एक नवीन ग्रंथ लवकरच प्रसिद्ध करणार आहों, असें आमचे मित्र रा. रा. दाजीसाहेब खरे व दादासाहेब खापर्ड यांनीं थोड्या घाईनें आगाऊच जरी जाहीर केले होतें, तरी आपली सामग्री अद्याप पुरी नाहीं असें वाटून ग्रंथ लिहिण्याचे काम दिरंगाईवर पडत चालले; आणि पुढे सन १९०८ सालीं शिक्षा होऊन ब्रह्मदेशांत मन्दले शहरीं जेव्हां आमचा रवानगी करण्यांत अाली, तेव्हां तर हा ग्रंथ लिहिण्याचा संभव बहुतेक खुटल्यासारखाच झाला होता. परंतु ग्रंथ लिहिण्यास अवश्य लागणारी पुस्तकादि साधनें पुण्याहून तेथे नेण्याची परवानगी कांहीं कालानें सरकारच्या मेहरबानीनें मिळाल्यानंतर सन १९१०-११-व्या हिंवाळ्यांत (शके १८३२, कार्तिक शुद्ध १ ते फाल्गुन वद्य ३० च्या दरम्यान) या ग्रंथाचा खडा मन्दलेच्या तुरुंगांत प्रथम लिहून काढिला; आणि पुढे वेळोवेळीं सुचत गेल्याप्रमाणे त्यांत सुधारणा केली, व तेव्हां सर्व पुस्तकें जवळ नसल्यामुळे कित्येक स्थळीं जो अपुरेपणा राहिला होता तो तेथून सुटका झाल्यावर पुरा करून घेतला. तथापि अद्यापहि हा ग्रंथ