पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/75

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मजिज्ञासा Y R त्याला उपदश करीत असे असें म्हटलें आहे (तै. १.११.१ व २)व महाभारतांतलि ब्राह्मणव्याध-आख्यानाचे तात्पर्यहिहेच आह ( वन. अ. २१३). परंतु या धर्मातहि कित्येकदां अकल्पित अडचणी निमीण होत असतात उपाध्यायान्दशाचार्यः अचार्याणां शार्ने पिता । सहस्रं तु पितृन्माता गौरवणातिरिचयति ॥ “दहा उपाध्यायांपेक्षों आचार्य, शंभर आचार्यापेक्षां पिता, आणि हजार पित्यांपेक्षां माता गौरवानें अधिक आहे,” असें मनु म्हणतो (२.१४५). तथापि मातेनें एक मेोठा अपराध केला होता म्हणून पित्याच्या आज्ञवरून परशुरामानें तिचा गळा कापला, ही कथा प्रसिद्ध आहे (वन. ११६.१४): आणि शांतिपर्वांत चिरकारिकापाख्यानांत (शां. २६५) अशाच प्रकारच्या दुसच्या प्रसंगीं पित्याच्या आज्ञवरून मांतचा वध करणे श्रेयस्कर किवा पित्याची आज्ञा मोडणें श्रेयस्कर याच्या तारतम्याचा ओनक साधकबाधक प्रमाणें देऊन एका स्वतंत्र अध्यायांत सविस्तर विचार केला आहे. यावरून आसल्या सूक्ष्म प्रसंगांचा नीतिशास्रदृष्ट्या ऊहापोह करण्याचा प्रघात महाभारतकाली पूर्ण प्रचारांत होता, असें स्पष्ट दिसून येतें. बापाची प्रतिज्ञा सत्य करण्यासाठी त्याच्या आज्ञेनें रामचंद्रांनी चवदा वर्ष वनवास पत्करिल्याची गेोष्ट आबालवृद्धांस माहीत आहे. पण वर जो मातेसंबंधानें न्याय सांगितला तोच पित्यासहि लागू करण्याची वेळ कधी कधी येऊं शकत्ये. उदाहरणार्थ, मुलगा आपल्या प्रराक्रमानें राजा झाल्यावर पित्याचा गुन्हा त्याच्यापुढे निकालासाठी आला, तर राजा या नात्यानें त्यानें आपल्या बापास शासन करावें किंवा बाप म्हणून सेाडून द्यावें ? मनु म्हणतो يخو c c حي पिताचार्येः सुट्टन्मात्ा भ्ायो पुत्रः पुरोाद्दतुः । , नावण्डयेr नाम राझेोऽस्ति यः स्वधर्मे न तिष्ठति । “ बाप, आचार्य, मित्र, आई, बायका, मुलगा किंवा पुरोहित केोणीहि असो, जर तो आपल्या धर्माप्रमाणें वागत नसेल तर राजास तो अदंडथ नाहीं, म्हणजे राजानं त्यास येोग्य शासन केलेंपाहिजे” (मनु.८.३३५; मभा. शां. १२१.६०).कारण, या ठिकाणीं पुत्रधर्मापेक्षां राजधर्म आधक योग्यतेचा आहे. याच न्यायानें महापराक्रमी सूर्यवंशी सगरराजानें आपला मुलगा असमजंस् दुर्वर्तनी असून प्रजेला दुःख देते असं आढळून आल्यावर त्याला हद्दपार केलें, असें भारत व रामायण या दोन्ही ग्रंथांत वर्णन आहे (मभा.व.१०७:रामा.१.३८.).मनुस्मृतीतच अशी एक गोष्ट आह कीं, आंगिरस नांवाच्या एका ऋषीस अल्पवयांतच उत्तम ज्ञानप्राप्ति झाल्यामुळे त्याचे काके, मामे, वगैरे वडील माणसें त्याच्याजवळ अध्ययन करूं लागली;तेव्हां पाठ चालला असतां शिष्यांस गुरु नेहमीं म्हणतो त्याप्रमाणे एका प्रसंगीं अांगिरसाचे