पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/94

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ गीतारहस्य अथवा कर्मयेोग अकार्य, कर्तव्य व अकर्तव्य, आणि न्याय्य व अन्याय्य, या जोडे शब्दांचा अर्थहि तोच आहे. तथापि हे शब्द वापरणाच्यांची सृष्टिरचनेबद्दलची मतें निरनिराळीं असल्यामुळे ‘कर्मयोग’ शास्राच्या निरूपणाचे पंथहेि निरनिराळे झाले आहत. कोणतेंहि शास्र घ्या, त्यांतील विषयांची चर्चा सामान्यत: तीन प्रकारें करितां येत्ये. (१)जडसृष्टीतील पदार्थ आपल्या इंद्रियांना ज्याप्रमाणे गोचर होतात त्याप्रमाणेच ते आहत, त्यापलीकडे कांहीं नाहीं, अशा दृष्टीनें त्यांबद्दल विचार करणें ही यांपैकीं पहिली पद्धत होय; व यास आधभौतिक विवेचन असे म्हणतात. उदाहरणार्थ, सूर्य ही देवता न मानितां केवळ पांचभौतिक जड पदार्थौचाच एक गोळा आहे असें मानून उष्णता, प्रकाश, वजन, अंतर, आकर्षण वगैरे त्याच्या गुणधर्माचेच जेव्हां परीक्षण करितात तेव्हां तें सूर्याचे आधिभौतिक विवेचन होतें. दुसरें उदाहरण झाडाचे घ्या. झाडाला पालवी फुटणें, वगैरे क्रिया कोणत्या अंतर्गत शक्तीनें होत असतात याचा विचार न करितां, जमीनींत बीं लाविलें म्हणजे अंकूर फुटतो व पुढे त्याचीच वाढ होऊन शाखा, पानें फुलें,फळे वगैरे त्याचे दृश्य विकार होतात, इत्यादि प्रकारें त्याचा केवळ बाह्यदृष्टयाच विचार केला म्हणजे तें झाडाचे आधिभौतिक विवेचन झाले. रसायनशास्र, पदार्थविज्ञानशास्र, विद्युच्छास्र, वगैरे आधुनिक शास्रांतील विवेचन याच प्रकारचे असतं. किंबहुना अशा प्रकारें एखाद्या वस्तूच्या दृश्य गुणांचा विचार झाला म्हणजे आपलें काम झाले, यापेक्षां सृष्टींतील पदार्थाचा जास्त विचार करणें निष्फल आह, असेंहि आधिभौतिक पंडित मानीत असतात. (२) ही दृष्टि सेोडून जडसृष्टीतील पदार्थाच्या मूळाशी काय आहे, या पदार्थाचे व्यवहार केवळ त्यांच्या गुणधर्मानेंच होतात किंवा त्यांच्या पाठीमागें दुसरें कांहीं तरी तत्त्व आहे, अशा दृष्टीनें विचार करूं लागलें म्हणजे आधिभौतिक विवेचनाच्या पलीकडे जाणें भाग पडतें. उदाहरणार्थ, पांचभौतिक सूर्याच्या जड किंवा अचेतन गोळ्यांत तदधिष्ठात्री सूर्य नांवाचा एकदेवता असून तीचू जूड सूर्याचे व्यवहार चालवित्ये असें जेव्हां ऑपण मानितों, तेव्हां त्यास आधिदैविक विवेचन म्हणतात. या मताप्रमाणें झाडांत, पाण्यांत, हवंत वगैरे सर्वत्रत्या त्या जड पदार्थाहून भिन्न अशा अनेकदेवता असून त्या सदर जड़ पदार्थाचे वृयवहार चालवितात असें समजण्यांत येतें. (३) पण जेडसृष्टींतील हजारों जड पदार्थात याप्रमाणें हजारों स्वतंत्र देवता न मानितां बाह्य सृष्टीचे सर्व व्यवहार चालविणारी व मनुष्याचे शरिरांत आत्मस्वरूपानें राहून त्याला सकल सृष्टीचे ज्ञान करून देणारी अशी एकच इंद्रियातीत चिच्छक्ति या जगां असून त्या शक्तीनेंच हें जग चाललें आहे असेंजेव्हां मानितात, तेव्हा त्यासू आध्यात्मक विवेचन्हें नांव देतात. उदाहरणार्थ, सूयैचंद्रादिकांचे व्यवहार, किंबहना झाडाचे पान हलणें देखील, या अचिंत्य शक्तीच्याच प्रेरणेनें