पान:गुन्हेगार जाती.pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाघरी. १०३ मोठ्या शहरांत गिरण्यांत उद्योगधंदा करून, जनावरें पाळून, मासे किंवा शिकार धरून पोट भरतात. दुष्काळांत ते मुंबईस येतात. कांहीं वाघरी भुईंतील शिकार, फांड्यांनी ( जाळी ) करण्यांत फार पटाईत असतात, व पाणकोंबडे, बदक, बगळे वगैरे पकडतात. साहेबलोक त्यांना शिकारी ठेवितात. ते पक्षांसारखे हुबेहूब आवाज काढतात, आणि दयाळू हिंदू- जवळून पैसे घेऊन धरलेलीं पांखरें सोडून देतात. दांतनिये आणि चुंवा- लिये पेटाऱ्यांतील चित्रे दाखवून पैसे मिळवितात. वेषांतर:- सोंग आणण्यांत वाघरी फार निपुण आहेत. त्यांच्या बायका गिरासणी, पाटीदारणी, रजपुतणी, ब्राह्मणीचे वेषानें व पुरुष, धाराळ कोळी, गिरासिया, माळी, फुलमाळी यांच्या वेषाने एखाद्या ठिकाणी नोकरीस राहतात, आणि संधि मिळाल्याबरोबर चोरी करून बाल्या हांकतात. एखादा सुस्वरूप बाबरी आपणाला ठाकूर म्हणवित आणि बाकीचे त्याचे नौकर बनतात. अशा रीतीनें वाणी किंवा इतर श्रीमंत मनुष्याची ओळख पाहून ते अंधाऱ्या रात्री चोऱ्या करतात. पुष्कळ वेळां आपण जोगी आणि ज्योतिषी आहों अशी वावरी बता- वणी करतात. गुन्ह्याचे ठिकाणी जातांना किंवा तेथून येतांना ते वाण्याचा किंवा साधूचा वेष घेतात. त्यांची भाषा, धर्मसंस्कारांचें अज्ञान, खादाडपणा, वेड्यावाकड्या रीति यामुळे त्यांची बतावणी फार वेळ टिकत नाहीं. गुन्हे:- चोरी, घरफोडी, ठकबाजी, खिसाचोरी (विशेषतः शहरांत ) ह्या गुन्ह्यांत वाघरी निष्णात आहेत. ते कधीं कधीं दरोडा व रस्तालूटही करतात. वेडू आणि दांतनिया जातींच्या बायका रेल्वेत बायकामुलांचे जिन्नस चोरतात. तळब्दे वाघरी व त्यांच्या बायका उभ्या पिकांच्या चोऱ्या करतात, आणि पुरुष ठकबाजी, घरफोडी व जनावरांच्या चोऱ्या करतात. पाटनी वाघरी जनावरांच्या चोऱ्या करतात. वाघरिणी रेल्वेनें, गैरकायदा अफू आणून ती आपल्या आंतल्या कपड्यांत लपवून ठेवितात.