पान:गुन्हेगार जाती.pdf/११८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

... 'कॉन्स्टेबल. शिलाकट्टी मुल्ला वाडू वड्डर. कर्नाटकांतील वडाऱ्यांचे सांकेतिक शब्द. घरफोडीचें हत्यार. मन कलु... १०९ बीळ. ... डोंगपानी, वलकमु. चोरीचा माल. ( मोठा पोलिस परमेश्वर कोहल, उंसलु. ( मारणें, छापा अमलदार. गांव कामगार, डोंग ( घालणें. चोरी. नेमतु ( गांवकरी. उंसलु, पेरडु ... घरावर दरोडा. पेरडु घर. रस्त्यांच्या पटावर किंवा ते वळतात तेथें भुसभुशीत मातीवर घट्टी वडार पावलाच्या बाजूनें एक रुंद रेघ काढून तिच्या शेवटीं ज्या रस्त्यानें ते गेले असतील त्या बाजूला एक पाऊल वढवितात, म्हणजे मागून येणाऱ्याला ते कोणीकडे गेले हैं समजतें. उपजीविकेची दर्शनीं साधनें:- मण्ण वडार शेती, शेतकाम व मातकाम करतात, विहिरी तळीं खणतात, आणि रस्तादुरुस्ती, मातीचा भराव, वगैरे कामे करतात. भंडी वडार दगडाची खाण लावून एंजीनिअर खात्यामार्फत दगड वाहतात, व विहिरी तळीं खणतात. थोडेसे शेतीही करतात. कल्ल वडार जातीं, उखळें वगैरे दगडाचीं कामें करतात. त्यांच्या बायका जात्याला टांकी लावितात. हे खाऊनपिऊन बरे आहेत. घट्टी वडारांचा निर्वाह गुन्ह्यावर असतो. वडार डुकरें पकडून मारतात. रानडुकरापासून पिकेँ राखण्यासाठी गांवकरी लोक त्यांना ठेवितात. वेषांतरः- दरोड्याच्या वेळीं ते धाटे बांधतात आणि छातीला व तोंडाला चुना फांसतात. ते शिटीनें व हातवाऱ्यांनी एकमेकांस खुणा करतात. गुन्हे:- मण्ण वडार घरफोडी, लहान चोऱ्या, उभें पीक चोरणें आणि पेंव फोडणें हे गुन्हे करतात. भंडी वड्डर पटाईत घरफोडे आहेत. ते मेंढ्या चोरतात, लहानसान चोऱ्या करतात, आणि कधीं कधीं दरोडा किंवा जबरीची चोरी करतात. कल्ल वडर बहुधा गुन्हे करीत नाहींत.