पान:गुन्हेगार जाती.pdf/१२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बौरी किंवा बौरिये. ११९ शिवाय कोणाला शिवूं देत नाहींत. बदक, मारवाड, खैरवाड आणि मोघिये सदर बळकटींत आणखी घागऱ्या किंवा घंटा घालतात, आणि त्याला देवी म्हणतात. गुन्हे:- ह्या जातीचा मुख्य गुन्हा घरफोडी होय. दिल्लीवाल, माल- पुरे व खैरवाड बौरी रात्रीं चोरी, पेट्या उचलून नेणें आणि घरफोडी करतात. ते दिवसां घरफोडी करीत नाहींत. दिल्लीवाल तंबूतल्या चोऱ्या शिताफीने करतात. बदक दिवसां व रात्रीं घरफोडी, पिकें, जना- वरें व इतर जिनसांची चोरी आणि रस्तालूट करतात. त्यांचीं बा- यकापोरें लहानसान चोऱ्या व उचलेगिरी करतात. मोधिये घरफोडी, रस्तालूट, दरोडा आणि पिकाजनावरांची चोरी करतात. मारवाड घर- फोडी, रस्तालूट, दरोडे, जनावरें उचलणें आणि ठकबाजी करतात. पंजाबी बौरी आपणाला खसवाले म्हणवितात. त्यांच्या बायका यात्रा वगैरेच्या ठिकाणीं जाऊन खिसाचोरी किंवा मुलांच्या अंगावरील दागि- न्यांची चोरी करतात. त्या मोठ्या घरीं मोलकरीण म्हणून किंवा कधीं कधीं रखेली म्हणून राहून गुन्ह्यासंबंधानें बातमी आपल्या पुरुषांना दे- तात. लहानसान जिनसा त्या आपल्या अंगावर लपवितात, किंवा गिळतात. पोलीसशी हे लोक मारामारीही करतात, आणि खोटी नाणीं व नोटा करतात. मालपुरे, मारवाड व बदकबौरी रेल्वेंतील प्रवाशास भूल देतात, अशी समज आहे. गुन्ह्यांची पद्धतिः- बौरी “ रामथे ” ला ( फेरीला ) कार्तिकांत निघतात आणि आषाढांत परत आपल्या घरीं जातात, अगर एखाद्या ठिकाणीं पावसाळाभर वस्ति करूनही रहातात. शुद्धपक्षीं एखाद्या गांवीं तळ पडला ह्मणजे कमाऊ आणि एखादा दुसरा हुषार पिटवाडी, आस- पासचीं गांवें धुंडाळण्यासाठीं निरनिराळ्या दिशांनीं निघतात. घरोघर भिक्षा मागतां मागतां जेथें गुन्हा करावयाचा तें घर, त्याच्या वाटा, त्यांतील माणसांची सांपत्तिक स्थिति वगैरे सर्व ते लक्षांत ठेवतात.