पान:गुन्हेगार जाती.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुन्हेगार जाती. भाषा:- बंजारी भाषा मारवाडीप्रमाणें असून तिच्यांत हिंदुस्थानी व मराठी शब्दांची भेसळ आहे. त्यांना हिंदुस्थानी बोलतां येतें, व ज्या प्रांतांत ते राहतात तेथील भाषाही त्यांना येते. ४ सांकेतिक भाषा: -कर्नाटकामध्यें लमाणी बोलींत घरफोडीच्या हत्या- राला 'सुळा, ' दराडेयाला 'धरदमार,' व रस्तालुटीला 'वाटमार' ह्मणतात. उपजीविकेचीं बाह्य साधनें:- रेल्वे व सडका होण्यापूर्वी बंजारे आपल्या बैलांवर मीठ, धान्य वगैरेंची ने आण देशभर करीत असत. आतां • पुष्कळ जण थोडथोडी शेती व शेतमजुरी करतात. त्यांतले गरीब लोक गवत, सरपण, मध जंगलांतून आणून विकतात. लोक त्यांच्या- कडे गुरे राखुळीला घालतात. सावसावकारी करणारा बंजारा एखाद- दुसराच नजरेस पडतो. कांहींजण ढोरें, शेळ्यामेंढया वगैरे लांब लांब नेऊन विकतात; व कांहीं थोडे बैल बाळगून भाडे करतात. कांहींजण जागले, बेलीफ, पोलीस आगगाडीवर हमाल आहेत. नवी रेल्वे, तलाव वगैरे कामांवर लंबाण्याचे तांडे असतात. ते बहुधा दिवसा काम आणि रात्री आसपासच्या गांवांत चोऱ्या करतात. वेषांतरः- दरोड्यासाठीं खवर काढण्याकरितां व जुळवाजुळव कर- ण्यासाठीं कर्नाटकमध्यें बंजारे हे, लिंगायत किंवा ब्राह्मणांचा वेष घेतात. गुन्हा करतांना ते घाटा बांधतात व राख किंवा पिंवडी फांसतात. - गुन्हे:- खाऊन पिऊन सुखी असे बंजारे बहुधा गुन्हे करीत नाहींत. कर्नाटकांत राहणारे लंबाणी लोकांपासून फार प्रलय आहे. रस्त्यावर लूट व दरोडा, घरफोडी, झोंपड्यांवर दरोडा, ढोरें व शेळ्यामेंढ्या चोरणें, बेकायदा दारू गाळणें हे त्यांचे मुख्य गुन्हे होत. शिवाय ते पेवें फोड- तात, रात्रीं चालणाऱ्या किंवा उतरलेल्या गाड्यांत चोया करतात, चोरलेलीं ढोरें परत देण्याकरितां दस्तुरी उकळतात, कधीं कधीं मुलें चोरतात. गुजराथेंत राहणारे गोवारिआ हे बिनपरवाना अफू आणतात. 3