पान:गुन्हेगार जाती.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बंजारे. ५ गुन्ह्याची पद्वतः- ढोरवाड्यांतून किंवा मैदानांत चरणाऱ्या कळपां- तून ते ढोरें व मेंढया पळवितात, व शिंगें खुडून, कानांचा आकार बद- लून, आणि डागण्या देऊन चोरलेल्या जनावरांचें स्वरूप बदलतात. कधीं कधीं चोरीचों जनावरें ते आपले जनावरांत मिसळतात. एका गांवचीं दहापंधरा जनावरें एका वेळीं जातात, पण ते प्रत्येक जनावर निरनिराळ्या वाटेनें नेतात. त्यामुळें चोरीचा पत्ता लागत नाहीं. दोन प्रहरीं गुराखी जेवण्यास गुंतला असतां किंवा त्याला डुकली लागली असतां पटाईत बंजारा उघड्या मैदानांतून ढवळ्यादिवसां देखील जनावरें लांबवितो. तांडे बायकांच्या जिमतीला लावून गुरें चोरण्यासाठी बंजारे लांच लांब जातात, आणि चोरलेलों जनावरें आडरस्त्यानें तांडयांत आणून सोड- तात. कधीं कवीं चोरी वें ठिकाण व तांडा यांच्या दरम्यान लोक ठेवून दोघेजण जनावरें चोरतात व हातोहात लांबवितात; आणि पेंड पोंच- विला कीं, जो तो आडरस्त्यानें परततो. रात्रींच्या वेळीं बंजारे मेंढ्यांच्या कळपांत शिरून त्यांना विचकवितात, आणि त्या धांदलींत प्रत्येक एक एक में डरूं उबत वाडेस लागतो. मेंढक्या आडवा झाला तर ते त्याला ठोकतात, किंवा दगड मारतात. कोणी अडथळा केला ह्मणजे बंजा- ज्यांना सुमार रहात नाहीं, व मग ते खवळतात. ते तिथे किंवा चौधे बंजारे एकट्या दुकट्या गाडीवाल्याला रस्त्यावर अडवितात. त्यांच्या जमावापुढें गाडीवाल्यांचें चालेनासें झालें झणजे धान्य, रोकड अगर चीजवस्त लुटारूंच्या हवालीं करतात. बंजाऱ्यांचा जमाव मोठा असला तर ते गाड्यांची संबंद हार अडवि- तात, आणि सावकाश एक एक गाडी लुटतात. दिवसां चोरी करणें झाल्यास ते ती आडबाजूच्या किंवा डोंगरांतल्या रस्त्यावर करतात, म्हणजे निर्धास्त असतें. दरएक टोळीला नाईक असतो व त्याच्या हुकुमाप्रमाणें तिच्यांतले लोक बागतात. नायकाला कानडींत 'साल्या ' ह्मणतात. होरा पाहणें,