पान:गुन्हेगार जाती.pdf/१६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पठाण. १५१ भगदाड पाडून ते घरांत घुसतात, आणि हाती पडेल तें नेतात. बगली पद्धतीनें ते मोठ्या गिरमिटानें दारांना किंवा खिडक्यांना प्रथम एक भोंक पाडतात; आणि त्याच्या भोंवतीं दुसरी भोंकें पाडून ते हात जाईल एवढें मोठें झालें म्हणजे आंत हात घालून कडी काढतात; कोणी आडवें आलें तर नागव्या तलवारी दाखवून त्यांना भिववितात आणि वेळ पडल्यास भोंसकतात. ते बहुतेक एकसारखे दिसत असल्यामुळे त्यांना ओळखून काढण्याची फार पंचाईत पडते. दरोड्यापूर्वी एकजण हकीम म्हणून एखाद्या वस्तीत राहतो, आणि एखादें घर शोधून काढतो; अगर गांवचा दुसरा एखादा बदमाष इसम हातीं धरून त्याचेकडून माहिती मिळवून मग ते दरोडे घालतात. फेरीवाल्याच्या किंवा व्याजबट्ट्याच्या धंद्यामुळें स्वतः घरें हेरीत, किंवा त्याबद्दल पूसतपास करीत या जिल्ह्यांतून त्या जिल्ह्यांत जाण्यास, आणि लुच्चा-सोयांची ओळख पाडण्यास त्यांना आयतें फावतें. शहरांतील पार एकीकडच्या घरावर ते जमावानें दरोडा घालतात. कधीं कधीं पठाण एखाद्या सावकाराचे घरीं नौकरीस राहतो, आणि घरचा ठाव घेतो. मग मुलुखांत जाण्याचे निमित्त करून तो नोकरी सोडतो, आणि टोळी बनवून त्या घरावर दरोडा आणतो, किंवा नौकरी न सोडतां आपल्या परठिकाणच्या स्नेह्यांस बातमी देऊन दरोडा आणतो. तें घर लुटीत असतांना हा आपल्या इमानाचें नाटक करण्यास चुकत नाहीं, आणि संशय येऊं नये म्हणून कांहीं दिवस तसाच नोकरही राहतो. देवळावर दरोडा घालण्यापूर्वी माहिती काढण्यासाठी एखाद्या परदेशी हिंदूची ते योजना करतात. तो व्यापाराच्या वेषानें तेथें जाऊन आपलें काम करतो. नंतर टोळींतील एकदोन पुढारी तें ठिकाण नीट पाहून घेतात, व तेथें किती अडथळा कसा येईल याची चौकशी कर- तात. जेव्हां नोंदीसाठी हत्यारें पोलीस ठाण्यांत आणतात अशा संधीला ते दरोडा घालतात, व साधारणतः लांबच्या देवळावर किंवा घरांवर धाड घालतात. गुन्ह्याचे ठिकाणापासून थोड्या अंतरावर ते संकेतस्थान