पान:गुन्हेगार जाती.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ गुन्हेगार जाती. राजरोष वावरतात, तरी ते अशा खुबीनें पद्धतशीर लहान लहान टोळ्या करतात कीं एकीच्या गांवांत दुसरी जात नाहीं, व त्यांचा एकमेकांशी संबंध आहे ह्याची कोणाला गंधवार्ताही लागत नाहीं. आपल्यांतल्या वडील व अनुभवशीर अशा माणसाला ते टोळीचा नाईक नेमतात. त्याला 6 खागडा ' ह्मणतात. त्याचा हुकूम सर्वजण बिनतकार मानतात, किफायतींत त्याचा हिस्साही इतरांपेक्षां मोठा असतो. प्रत्येक टोळींत 'हंडीवाळ ' लणून एक हरकाम्या मुलगा असतो. स्वयंपाक करणें, वाढणें, पाणी आणणें, जनावरें राखणें हीं त्याचीं कामें होत. शिवाय तो हेराचें काम करतो. छप्परबंद आपलें सामान डोक्यावर नेतात; पण. वेळ पाहून घोडें चोरून त्यावर बसतात आणि सामानही वाहतात. त्यांचा तळ पाण्याजवळ उंचवट्यावर असतो, कारण कीं तेथें कोणी झाडा घ्यावयास आलें तर सांचे, खोटे रुपये वगैरे तेव्हांच नाहींसे करतां येतात. खागडा आणि हंडीवाळ खोटी नाणीं चालवीत नाहींत. हें काम टोळी- तील इतर लोक करतात, त्यांना “ भोंडार " म्हणतात. तळावर राहून खागडा स्वयंपाक करतो, व जेव्हां टोळी वाट चालते तेव्हां तो हंडी- वाळाला बरोबर घेऊन घोडेस्वार होतो, आणि सांचे, माती, धातू आपले बरोबर नेतो. त्याचेजवळ खोटी नाणीं कधीं नसतात. भोंडार निरनिरा- ळ्या वाटांनीं जीं लागतात त्या गांवीं आपला रोजगार करीत करीत पूर्वी ठरलेल्या मुक्कामाच्या जागीं आगाऊ जाऊन भिडतात. तळा- वर खागडा पोंचला ह्मणजे त्याचें पहिलें काम हें कीं जवळ- पास रोकड व सांचे पुरणें, किंवा नजीकचे गवतांत, झुडुपांत किंवा झा- डांचे गाभ्यांत लपविणें. भोंडारही आपलेजवळचीं खोटी नाणीं ह्या- प्रमाणे दडवितात. सांचे, खोटी नाणीं वगैरे तळावर अंथरुणाखालींही ठेविलेली सांपडतात. ह्मणून त्यांच्या तळाचा झाडा बारकाईनें घ्यावा. छप्परबंद वाट चालत असतांना खोटी नाणी तयार करतात. गोपी- चंदन बलफ किंवा त्यासारखी दुसरी चिकणमाती वस्त्रगाळ करून पाण्यांत भिजवून एकजीव करतात. नंतर ती निमानिम करून