पान:गुन्हेगार जाती.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ गुन्हेगार जाती. एकीकडे फेंकून देतात, आणि परत येऊन तो घेऊन जातात. एखाद्या- विषयीं कपटाचा संशय आल्यास त्याला प्रमाण करावयाला लावितात. म्हणजे कढत तेलांत आंगठी किंवा चवली टाकतात आणि ती त्याला काढावयास सांगतात. जर त्याचीं बोटें भाजलीं नाहींत तर तो निर- पराधी समजतात. कैकाड्यांचा तळ फार दिवस एकाच गांवीं पडून राहिला तर असें समजावें कीं गांवकामगार वगैरे त्यांना अनुकूल आहेत. चोरीचा माल गाढवाच्या वळींत किंवा गोणींत लपवून एखादी झातारी बाई त्याजवर किंवा त्याबरोबर जाते. कैकाड्यांचा झाडा घेतांना एखादी बाई शौचाला किंवा लघवीला जाऊं लागली तर तिजवर लक्ष असावें. कारण बायका लुगडयाच्या निऱ्यांत, तोंडांत, बगलेंत जिनसा लपवितात. एकदां कैकाड्याच्या तळाची जमीन नांगरली तेव्हां तेथें चौदाशे रुपये सांपडले. सबब झाडा घेतांना तळाची जमीन नांगरावी. कोव्यामध्ये अशी रीत आहे कीं, टोळींतील एक इसम आडरस्त्यानें हल- क्या किंमतीचा चोरीचा माल व कंगट्टी आणि कुन्हाड घेऊन जातो. नवीन तळाला पोचल्यावर टोळींतील एखादा दुसरा इसम जुन्या तळा- च्या जागेवर परत येतो आणि रात्रीं तेथील माल घेऊन जातो; आणि मग नव्या तळाजवळ तो पुरून ठेवितात. कातकरी. संज्ञा: - ह्यांना “ काथोडी " ह्मणतात. ह्यांच्या दोन पोटजाती आहेत. “ ढोर कातकरी " आणि मराठे अथवा “ सोने कातकरी. " वस्तिः समुद्रकांठ व सह्याद्रि पर्वत यांच्यामधील, नद्या, नाले वाहतात अशा जंगलप्रदेशांत त्यांची वस्ति आहे. समुद्रकांठी किंवा घांटास्वालीं त्यांची वस्ति नाहीं. त्यांची शेंकडा नव्वद वस्ति ठाणें आणि