या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५) एका फळाचे किती भाग करावे हे विद्यार्थ्यांना सांगावे (६) फोडी शिजविण्यासाठी पाणी किती टाकावे व का हे सांगणे. (७) फोडी किती वेळ शिजवाव्यात हे विद्यार्थ्यांना सांगणे. (८) आलेला अर्क मोजण्यास सांगणे. (९) जेली तयार केल्यावर चांगल्या जेलीची लक्षणे मुलांना सांगणे. (१०) जेली पॅकींगबद्दल माहिती द्या. उपक्रमाची निवडः (१) चिंचेची जेली तयार करा. (२) स्ट्रॉबेरीची जेली करा. (३) जवळच्या जेली उद्योगास भेट देऊन माहिती घ्या. अपेक्षित कौशल्ये: (१) चांगल्या जेलीचे लक्षण सांगता येणे. (२) फळानुसार साखरेचे प्रमाण ठरविता येणे, (३) जेली झाली की नाही याची चाचणी घेता येणे, जेली तयार करणे. उद्देश : अन्नपदार्थ टिकवण्यासाठी परिसरात उपलब्ध पेरूसारख्या फळांपासून जेली तयार करणे, विक्रीसाठी त्याचे योग्य मापात पॅकींग करणे व विक्री किंमत ठरवणे. अपेक्षित कौशल्ये : प्रात्यक्षिकात अंतर्भूत असलेली पाककौशल्ये विद्यार्थ्याला अवगत होतात, जेली तयार झाल्याच्या कसोटीवरून अनुमान काढता येते. साहित्य व उपकरणे : पेरू २ किलो, साखर १७५ ग्रॅम, लिंबू रस, दालचिनी, लवंग, पाणी, स्टेनलेस स्टीलचे पातेले, झाकणी, चमचा, प्रेशर स्टोव्ह, प्रेशर कुकर, जाळीदार पिशवी, बाटली किंवा बरणी इ. माहिती : प्रवाहाकृती तयार करतानाचे संकेत - (१) कृतीचा प्रवाह वरून खाली किंवा डावीकडून उजवीकडे असला पाहिजे. (२) संपूर्ण कृतीतील एखाद्या टप्प्यावरची प्रक्रिया करण्यापूर्वीच्या मालाचे नाव बाणाच्या पाठीशी लिहितात व प्रक्रिया केल्यानंतर तयार झालेल्या वस्तुचे नाव बाणाच्या पुढच्या टोकाशी लिहितात. (३) बाणाच्या डाव्या बाजूला प्रक्रियेचे नाव लिहितात. (४) बाणाच्या उजव्या बाजूस प्रक्रियेसाठी वापरण्याच्या उपकरणाचे नाव लिहितात. (५) प्रक्रियेदरम्यान घातलेल्या पदार्थाचे नाव उजव्या बाजूला आडवा बाण काढून त्याच्या पुढच्या टोकाशी लिहितात व या बाणाचे पाठीचे टोक उभ्या बाणाला चिकटवलेले असते. (६) प्रक्रियेदरम्यान बाहेर पडलेल्या किंवा काढून टाकण्याच्या पदार्थाचे नाव उजव्या बाजूला आडवा बाण काढून त्याच्या पुढच्या टोकाशी लिहितात व या बाणाचे पाठीचे टोक उभ्या बाणाला चिकटवलेले असते. (७) संपूर्ण प्रवाहाकृतीच्या सर्वात वरच्या बाजूस कच्च्या मालाचे नाव व सर्वात खालच्या टोकास तयार पदार्थाचे नाव असते. प्रवाहाकृतीची मर्यादा : कृतीच्या एखाद्या टप्प्यावर कोणतीही प्रक्रिया नसते. परंतु फक्त मोजमाप किंवा आकृती काढण्याचे काम केले जाते, त्यासाठी साधने वापरली जातात; अशा गोष्टींचा उल्लेख प्रवाहाकृतीत करता येत नाही किंवा असे उल्लेख प्रवाहाकृतीला क्लिष्ट बनवतात. प्रवाहाकृतीचे फायदे : (१) कृतीचे वर्णन क्रमवार, बिनचूक व थोडक्यात करता येते. (२) क्रमवार पद्धतीमुळे कृतीची मधीलच एखादी पायरी किंवा भाग विसरला जात नाही. ४१