पान:गोगलगाईचे पंख.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चांदणी दिवे एक गाव घराच्या मागे नाव त्याचे वडंगे टेकडीवरचे सुंदर खेडे रस्ते तिथले वेडे वाकडे हिरव्या गर्द झाडांत उंच उंच माडांत कौलारू घरे लहानखुरी देवळाचे शिखर उंचभारी दिवसा उन्हात चमकते सगळेच शांत भासते रात्र होताच लागतात दिवे चांदण्याची रांग मनाला भावे दाट काळोखात उजेड शांत आम्ही आहोत म्हणे झोपा निवांत सुर्याला पाहाताच वंदन करुनी विसाव्याला जातात निघूनी 64 है,