या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय १०२ प्रस्तुत प्रकरणांत गोवा प्रांताचे विहंगम दृष्टीने वर्णन करण्याचा प्रयत्न लेखक करणार असून प्रेक्षणीय स्थळे, देवालये, धर्मपीठे, चर्च, झरे व समुद्रस्नानाच्या जागा या अनुक्रमानें तो करावयाचा आहे. दोन प्रवेशद्वारेंः-रेल्वे मार्गाने वागांझा घाटांतून एक व जलमार्गानें, पणजी किंवा मुरगांव बंदराचा दुसरा, असे गोमंतकप्रवेशाला दोन प्रमुख दरवाजे आहेत. क्यासलरॉक स्टेशन सोडतांच, घनदाट वृक्षवनस्पतींमधून व हिरव्यागार जंगलांतून नागमोडीने उतरणारा आमचा लोहमार्ग फारच प्रेक्षणीय आहे. कधी मध्येच आडवे येणारे गगनभेदी व कृष्णवर्ण पहाड तर कधीं भूगर्भातून जाणारा रस्ता, कधीं पातालाचा ठाव घेणाऱ्या दऱ्या तर कधी उंच पूलांच्या मालिका, कधी नयनरम्य व सहज मनोहर असे जलप्रवाह तर कधी दूरवर न्याहाळतां येणारा गोमंतकीय पुण्यभूमीचा देखावा, अशा रमणीय व सौंदर्यपूर्ण दरवाजाने प्रवेश करणाऱ्या पाहुण्याला, पुढेही आपल्याला असाच आल्हादकारक देखावा पहायला मिळेल अशी कल्पना झाली तर ती साहजिक ठरेल. जलमार्गाने येणाऱ्या प्रवाशानां आरंभीच दुरून दिसणारा व मान उंच करून. गोद्धत दृष्टीने मधून मधून तेजाचे फवारे सोडणारा आग्वादचा दीपस्तंभच सामोरा येत असतो. “ गोमंतकांत येत आहांना ? अवश्य या.मी जसा कधी नम्र कधीं प्रखर प्रकाश देत असतो, तसाच गोमंतकही कधी नम्न व जरूर पडल्यास प्रखर तेजस्वी आहे" असेंच जणुं काय तो दर्शवित असतो. पुढे आग्वाद व मुरगांव या दोन टोकांमध्ये प्रवासी पोचतांच मांडवी व अघशी या उभय सवतींचा तो मधुर प्रेमसंगम त्याच्या दृष्टिपथांत येतो. एकीकडून मुरगांवचें भूशीर व दुसरीकडून आग्वादचें टॉक अशी या संगमावर खडा पहारा करीत आहेत. सवतींचाच संगम तो! तेव्हां त्याचे मनोहारित्व काय वर्णावें ! शिवाय तो जितका मनोहर तितकाच चंचलहीपण आहे याचेही नवल नाही. गोमंतकाच्या प्रवेशद्वाराशी होणारा हा संगम भीषणतंतही मुळीच कमी नाही. उभय सपत्नी खवळल्या, म्हणजे काबच्या भूशीरासमोर त्यांचा जो पिंगा सुरू होतो, संतापलेल्या नागिणींप्रमाणे त्याच्या तोंडांतून जो फेंस निघतो, तो पाहतानां निधड्या छातीच्या नावाड्यांची देखील हबेलंडी उडते. गोमंतकीय नंदनवन जो अंत्रुजप्रांत, त्याचे इतरेजनांच्या दृष्टिपातापासून रक्षण करण्याकरितांच की काय; नदीच्या प्रवेशद्वारांत, एका बाजूने मुरगांव व दुसरीकडून काब यांचा खडा पहारा आहे. त्याचप्रमाणे कदंबांची नगरी, आलबुकेर्कची वैभवशाली राजधानी, ती पूर्वकालीन उतारपेठ, आज कंगाल दशेला पोंचली आहे. तेव्हां अशा उपेक्षणीय