या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय उपसंहारात्मक दोन शब्द. ___ e:___ गोमंतक परिचय संपला, तेव्हां उपसंहारात्मक दोन शब्द सांगून मोकळे होऊ. गोमंतक प्रांत व तेथील जनता यांचे वास्तविक स्वरूप हे असें आहे. इतक्या दीर्घ कालावधीत परकी संस्कृतीच्या वरवंट्याखाली चेपला गेला असतांही, गोमंतकीय हिंदुसमाज आपल्या उद्धारासाठी जी धडपड नेहमी करीत आला, तिचे प्रस्तुत पुस्तकांत उपयोगांत आणलेल्या ऐतिहासिक साधनांवरून जें स्वरूप दिसून येते, त्याचे प्रत्येक गोमंतकीयास साभिमान कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. पुस्तकाच्या वाचनामुळे गोमंतकाची माहिती मिळून इतरत्र नांदत असलेल्या गैरसमजांचे निराकरण झाले व गोमंतकीयेतर हिंदूंचा दृष्टिकोन बदलण्यास याची किंचित देखील मदत झाली, तर लेखकाला श्रमसाफल्याचा अत्यानंद होईल. त्याप्रमाणे आपल्या प्रांताविषयी माहिती संकलित करून तो थोडातरी यशस्वी झाला तर प्रांताचे जे ऋण त्याच्या शिरावर आहे, त्यांतून तो मुक्त होईल. श्री. जगन्नियत्याच्या कृपेनें व वाचकवर्गाच्या प्रेमाशिर्वादाने त्याला या ऋणमुक्ततेचा लाभ झाल्यास पुढे या ग्रंथांतील उणीव काढून गोमंतकाचा समग्र इतिहास वाचकांना सादर करण्याची फार दिवस हृदयाशी बाळगलेली इच्छा पूर्ण करण्यास त्याला हुरूप येईल. )