या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय २४ विश्वासून बरेच सुलतानी हुकूम सोडले होते. मोकाशें, इनामें, कुटुंबणे इत्यादिकांवर कर बसवून ती खालसा करणे, ‘काल्सोयु' नांवाचा जाहीरनामा काढून विजारी न घालणारे पुरुष व चोळ्या न घालणाऱ्या स्त्रिया यांना पकडणे, जंगलाचा कायदा जारी करणे, इत्यादि बाबींनी प्रजेवर शिपायांचे व पाखल्यांचे ( पोशी सोल्जरांचे ) अत्याचार सुरू झाले. चोळ्या नसण्याच्या सबबीवर स्त्रियांवर बलात्कार देखील होऊ लागले. तेव्हां १८५२ च्या जानेवारीच्या वर सनर प्रांतांतील राण्यांनी दिपाजी राण्याच्या नेतृत्वाखाली बंडाचा झेंडा उभारला. सवातीसच त्यांनी सत्तर प्रांतांतील नाणसाचा किल्ला घेऊन त्यांतील शस्त्रे हस्तगत केली व जिकडे तिकडे लूटफाट चालविली. सरकारने त्यांवर सैन्य पाठविलें. त्यांपैकी सामान्य तुकडी दिसल्यास राणे तिचा पाडाव करून शस्त्रे काढून घेत. व मोठी तुकडी सांपडल्यास हेमाडबार्से व फोंडे यांतील दुर्गम जंगलांत कोठच्या कोठे निघन जाऊन दिसेनासे होत. बंड मोडण्यासाठी म्हणून नव्या काबिजादींतील प्रजेचे सनदशीर हक तहकूब केले. परंतु परिणामी पुष्कळशा संशयी माणसांना धरून गोळी घालून मारण्याशिवाय दुसरा कोणताच फायदा निष्पन्न झाला नाही. बंड मात्र विशेषच चेतले. बंडवाल्यांनी सांगें व के प्रांतांत धुमाकूळ घातला. बंड मोडण्याच्या कामी खर्चाकरितां ६ लक्ष असपर्त्यांचे कर्ज काढण्यात आले. परंत कर्जाचे रोखे घेणारे मिळेनात. तेव्हां ते रोखे लष्करी लोकांकडून जबरदस्तीने वसूल करण्यांत आले. सप्टेंबर महिन्यांत गव्हर्नरसाहेब जातीने सुमारें चारशे शिपाई घेऊन सत्तर प्रांतांत गेले. त्यांना बंडवाले दिसेनात. पुढे सरकारने इ. स. १८५४ त पेगाद नांवाच्या लूझो इंडियनास दिपाजी राण्याकडे तहाचें बोलणे करायला पाठविले. पेगाद याची दिपाजी राण्याकडे मुळची मैत्री होती. तिला स्मरून दिपाजीने त्याची भेट घेतली. तेव्हां पेगाद यानें त्याला गव्हर्नरच्या भेटीस बोलाविले. त्याप्रमाणे ठरतांच पेगाद याचे तीन मुलगे ओलीस रेल दिपाजी राणे “ काब" येथे गव्हर्नरच्या भेटीस गेले. परंतु इतर बंडखो बरोबर घेऊन न येता एकटाच आल्याच्या सबबीवर गव्हर्नरने त्यांची और घेतां त्यांना परत लाविलें. राण्याने गांजे येथे सुखरूप पोचतांच ओलीस ठेवलेल्या इसमांना सा सोडन दिले. व पुनः लुटफाट दुप्पट जोराने चालविली. पदेंग कंटाळले व त्यांनी "कोसेल्यु गोव्हेनौतीव्ह " च्या हातीं राज्यसूत्रे संपवन इ. स. स्वदेशी प्रयाण केले. लागलीच कोन्सिलने राण्यांच्या इनामाविषयींच्या वगैरे अटी मान्य केल्या व त्यांनां माफी देऊन बंड शमविलें.