या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय २६ तिसऱ्या बटालियनने तळ दिला होता, तेथे त्यांना मिळाले. ही हकीकत पणजी येथे समजतांच गव्हर्नरने शाळा बंद केल्या; लष्करी कॉलेजांतील विद्यार्थ्यांनां शस्त्रे दिली; आणि मेटेकोट उभारून शहराच्या बचावाची जय्यत तयारी केली. तेव्हां साऱ्या वंडखोर पलटणी मागें सरून पुनः माशेलांत गेल्या, आणि त्यांनी खालील सात मागण्यांचा खलिता, त्यांचे म्हणणे समजून घ्यावयास गव्हर्नरने पाठविलेल्या इसमाकडे दिला. १ कैद्यांची मुक्तता. २ वळवई येथें कबूल केलेला पगार सर्वांनां मिळणे 3 सैन्याचा पगार फोर्त रेसांत मिळणे ( वाढविणें ). ४ विधवांनां पेन्शन. ५ दरसाल तीन उमेदवारांची ऑफीसरांत भरती होणे. ६ पोर्तुगालच्या ऑफीसरांच्या आगमनाने येथील ऑफीसरांचे हक्क न वुडविणे. ७ बंडाची माफी. प्रजा हा वंडाच्या विरुद्धच होतो. जरूर पडल्यास स्वसंरक्षणार्थ व राज्यरक्षणार्थ आपण शस्त्रे घेऊ असे आश्वासन त्यांनी गव्हर्नरला दिले. ही तयारी पाहतांच बंडखोरांची गुर्मी बरीच जिरली. शिवाय हे बंड शिपाईलोकांच्या नुकसानीसच कारणीभूत होणार, आणि फायदा झालाच तर तो ऑफीसरांचा मात्र होणार, इतकेंच नव्हे, तर तें उपस्थित करण्याचा मुख्य हेतु ऑफीसरांचीच वर्णी लावण्याचा आहे, अशी खरी माहिती सरकारने शिपायांच्या कुटुंबांत पसरविली. ता. २९ सप्टेंबर रोजी जनरल पीन्यु हे गव्हर्नरचा जाहीरनामा घेऊन माशेलांत गेले. या जाहीरनाम्यांत बंडवाल्यांना माफी देण्यांत आली होती. बंडवाल्या पलटणी ता. १ आक्टोबरपर्यंत आपापल्या छावणीत गेल्या व बंड मोडले. पोर्तुगाल सरकारने गव्हर्नरने दिलेल्या माफीला संमति देण्याचें नाकारले. व गव्हर्नरला परत बोलावून त्याच्या जागी जनरल मासेद यांची नेमणूक केली. नवे गव्हर्नरसाहेब सोबत पोर्तुगीज सोल्जरची एक पलटण घेऊन राजबंधु दों आगुश्त यांच्यासह स्पेशल आगबोटीतून आले व त्यांनी साऱ्या गोमांतकीय सैन्यास रजा दिली. फक्त १ पोलीस कोर, १ अबकारी कोर, तोफखान्याची एक व्याटरी व नुकतीच आणलेली रोपियन पलटण, एवढेच लष्कर कायम केले. अर्थातच लष्करी कॉलेजचीहि आतां जरूरी राहिली नाही; तेव्हां तेंहि बंद करण्यांत आले, आणि त्या ऐवजी धंदेशिक्षणाची शाळा उघडली गेली. कष्टोबाचा पुंडावाः-इ. स. १८६९ त म्हणजे वरील धामधुमी चालू असतानांच भतग्रामच्या (सांखळी प्रांतांतील कुष्टोबा नांवाच्या दरोडेखोराने काले येथील शाबा सावंताच्या मदतीने गोमंतकभर पुंडावा सुरू केला. तो सारखा तीन वर्षे चालला होता. शेवटी १८७१ साली कुष्टोबाला फितुरीने ठार