या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय समतेचे हकः-कायद्यासमोर सर्व व्यक्तींचा दर्जा सारखा मानला जाईल. वर्ण, धर्म, जात, इत्यादि बंधनें कायद्यानें मानली जाणार नाहींत. एका लायकीच्या मद्याखेरीज सरकारी नोकरीच्या वगैरे बाबतींत इतर कोणतीच बंधनें विचारांत घेतली जाणार नाहीत. शिक्षणः-प्रजाजनांनां प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीने देण्याविषयी सरकार बांधले गेले आहे. न्यायः-न्यायखातें इतर राजकीय खात्यांपासून पूर्णपणे स्वतंत्र राहील. पत्रव्यवहारः-इतरांची पत्रे परवानगीशिवाय फोडून वाचणे हा गुन्हा समजला जाईल. धार्मिक बाबः-रोमन क्याथॉलिक पंथ हा सरकारी धर्म मानला जाईल. इतर धर्मीयांना आपापले धार्मिक विधि करण्याची पूर्ण मुभा आहे. मात्र तेणें करून सरकारी धर्म, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक नीतिमत्ता यांना धक्का पोंचतां कामा नये. राज्यकारभारः-गोमंतकांतील राज्यकारभार चालविण्यासाठी गव्हर्नरला junta geral da provincia ज्युत जरालदा प्रोव्हीसिय व Conselho do governo कोसेल्यु दु गोव्हेर्नु नांवाच्या दोन सभा असत. परंतु त्यांचे ठराव गव्हर्नरला बंधनकारक नव्हते. शिवाय या संस्था देखील प्रतिनिधिक स्वरूपाच्या अशा नव्हत्या. ज्यंत जरालच्या सभासदासाठी गोमंतकांतील प्रत्येक म्युनिसिपालिटी किंवा म्युनिसिपल कमिटी तीन तीन नांवाची यादी सरकारास पाठवीत असे व त्या नांवांतून गव्हर्नरसाहेब एका एका गृहस्थाची निवड करीत असत. कोसेल्यु दु गोव्हेर्नु ही संस्था तर पूर्णपणे सरकारीच होती. खास गव्हर्नर अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, आर्चबिशप रॅलासांवांचे प्रेसिडेंट, कायद्याचे सल्लागार, आरोग्यरक्षणखात्याचे चीफ सर्जन, जमाबंदी खात्याचे मुख्याधिकारी, लष्करी ऑफिसचा मुख्य अधिकारी व एक उच्च हुद्याचा लष्करी अंमलदार हे तिचे सभासद होते. कोणत्याही महत्वाच्या प्रश्नाबद्दल ह्या संस्थेचे मत घ्यावे लागे. परंतु तें निर्णयात्मक नसून प्रश्नाच्या आवश्यकतेबद्दल व जरूरीबद्दलच होतें. अखेरचा निर्णय गव्हर्नरसाहेबांचाच होता. या दृष्टीने पाहतां, ज्युत जराल दा प्रोव्हींसिय हे कायदेमंडळ, व कोंसेल्यु दु गोव्हेर्नु ही सभा कार्यकारी कौन्सिलच्या जागी होत्या असे म्हटले तरी चालेल.