या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय तीस पस्तीस रुपये खर्च येतो. मात्र हिंदुस्त्रियांना पतिगृहीं जी नांवें मिळतात त्यांना ही भानगड लागू नसते. साऱ्या गोमंतकांत ह्या सिव्हिल नोंदणीच्या ६२ कचेऱ्या आहेत. जकात खाते: ह्या खात्याचा उगम गोव्यांत फार प्राचीन काळी झाला होता. कदंब जयकेशी यांच्या कारकीर्दीत (म्हणजे १०५४ इ. च्या पूर्वी ) गोवें शहरांत आयात निर्गत मालावर शेकडा ६ टक्के जकात घेण्यात येत होती, असा नंदीनगरच्या ताम्रपट्यांत उल्लेख आहे. मोती, रत्ने, सोने, रुपे आणि घोडे, यांना मात्र अपवाद होता. जकातीच्या कचेरीला त्यावेळी मांडवी म्हणत व तेंच नांव जकातीच्या नाक्याजवळच्या नदीस मिळाले. इ. स. १५४१-१५४२ त जकातीचे उत्पन्न मक्त्याने देण्यात येई व त्या मक्त्याची रक्कम त्यावेळी २५००० असा येत होते. मुख्य कचेरीशिवाय पणजी, धावजी, भाणस्तार, अधशी, नार्वे, सांतेती व चोडण ही नाकी असत. __पुढे ही नाकी निराळी झाली व १५९४ त फक्त मुख्य कचेरीचे उत्पन्न १.८९.४८० असा होण्याइतका गोवें शहरचा व्यापार वाढलेला होता. पुढे सासष्ट व बारदेश प्रांत हातीं येतांच त्यांतही नाकी निर्माण करण्यांत आली व नव्या काबिजादीच्या भरीने ह्या नाक्यांत घाटांतील बैल लमाणांच्या वाहतुकीवर जकात घेण्यासाठी, तिनई, केशी, दिगी, खंडळ, दोंको, रामघांट, मावळींगें, केळघांट, परवर, धामेगड व तेलघाट हीं नाकी स्थापण्यांत आली. यांतून पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या ठरावाप्रमाणे जकात घेण्यांत येई व तिचे उत्पन्न पूर्वकालीन राजांनी आपल्या सरदारांस इनामादाखल दिल्यामळे. त्यांना व देवळांनां देण्यांत येई. शिवाय फोंडेंच्या जकात नाक्यावर देवालयांच्या ५० बैलांच्या लमाणास जकात माफी असे. पोर्तुगीज राजवटींत जकातीच्या दरांत पुष्कळदां फेरफार झाले. पैकी सुरुवातीस इ. स. १५६८ ते १५७० पर्यंत जकातींचा दर ६ टक्यांवरून सात टक्यांवर गेला व वाढलेल्या एका टक्याचे उत्पन्न तारवें बांधण्यास गोव्याच्या सीनेटला ( म्युनिसिपालिटीला ) मिळावें असें ठरले होते. नंतर हॉलंडशी चाललेल्या यद्धाच्या काळी युद्धखर्चाची तरतूद करण्याकरतां हा कर वाढवून ९ टक्के करण्यांत आला. त्यापैकी सीनेटला तीन टक्के देऊन सरकारने आपल्याला ६ केच राखले होते. १७२४ त जकातीचा दर उतरून ९ चा पांच टक्यांवर आणला गेला. परंतु त्याची वाटणी मात्र इ. स. १७४४ पर्यंतच पूर्वीप्रमाणेच