या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ७० सालापासून लष्करी पोलिस ऑफीसरहि हे अधिकार चालवीत असल्यामुळे, ह्या बाबींत एका म्यानांत दोन सुयांसारखा प्रकार झालेला आहे. न्यायखाते:-मागील विवेचनांत न्यायखात्याची माहिती आम्ही सदनशीर राज्यपद्धतीच्या सुरुवातीपर्यंत आणून पोंचविली होती. न्यायखात्याची अम्मलबजावणीखात्यांशी खरी फारकत याच सुमारास झाली होती. सनदशीर राज्यपद्धतीची स्थापना गोमंतकांत होतांना, इ. स. १८३८ त न्यायखात्यांत बराच फेरफार झाला. हायकोर्टाचे जज्ज पांचाच्या ऐवजी तीनच राहिले व तिसवाडी, बारदेश व सासष्ट अशा तीन कोमाकांत गोमंतक प्रांत विभागला गेला. प्रत्येक फ्रेगेझींत ( रॅजिदोरीच्या क्षेत्रांत) लोकांनी निवडलेला एक जज्ज व दुसरा जे. पी. असे. याच साली रॅलासांवांत व कोमाकांत सरकारी वकिलाची जागा स्वतंत्र होऊन त्यांचे अधिकार निर्णित झाले. इ. स. १८३७ त प्रजेचा ज्युरीचा हक्क काढून घेण्यांत आला. १८५४ सालीं पीनलकोड गोमंतकास लागू करण्यांत आले व त्यांत जें हद्दपारीचे कलम होतें तें १८५६ साली हिंदू पुरतें रह करण्यांत येऊन त्या ऐवजी हिंदु गुन्हेगारांना गोव्याच्या गोदीत सक्तमजुरीची शिक्षा भोगावयाला लावण्याचे ठरले. परंतु पुढे १८७० त गोदी काढून टाकतांच हे कलम पुनः हिंदूंना लागू झाले. इ. स. १८५६ त रॅलासांवाच्या जज्जांची संख्या तीनांऐवजी ४ करण्यांत आली. व १८६४ सालीं पेडणे, सांखळी, फोंडे व के येथे एक एक जुल्गाद (डिस्ट्रिक्ट कोटाखालच्या दर्जाचे कोर्ट ) निर्माण करण्यात आले व इ. स. १८६६ साली तसलींच दोन जुल्गादें, असोळणे व कळंगट येथे स्थापन झाली. फ्रेगेझींतील (रजीदोरीच्या क्षेत्रांतील ) लोकनियुक्त जज्जाची व्यवस्था नष्ट करून त्याचेही अधिकार जे. पी नांच देण्यात आले. १८६७ त रजिस्टेशन कचेन्या स्थापन झाल्या. पण या कचेऱ्यांतील रजिस्ट्रेशनपेक्षा पूर्वीच कोमुनदादींत जी (तील) ठिकाणझाड्याची पद्धति होती तीच चांगली होती. कारण सीमांची नांवें बदलून एकच इस्टेट दोन तीन नंबरांखाली रजिस्टर करतां येणें कोमुनदादीच्या ठिकाणझाड्यांत शक्य नव्हते. सर्व्हेच्या अभावाने तें रेजिस्टेशनमध्ये आज शक्य झाले आहे. इ. स. १८७० त गोव्याला कोड नेपोलियन थोड्याच फेरफाराने लागू करण्यांत आले व लष्करी गुन्ह्याशिवाय इतर गुन्ह्यांस देहांत शिक्षा देणे बंद केले. इ. स. १८७८ त रॅलासांवाच्या जज्जांची संख्या ४ ऐवजी ५ जज्जांची झाली व डिचोली व के अशी दोन नवी कोमा स्थापन झाली. गोमंतकांतील सहाही