या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण तिसरें. जाईल. ज्यांनां दंड देण्याची ऐपत नसेल, त्यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा मिळेल. ज्या नारळीच्या भाटांतून ही लग्ने होतील त्यांच्या मालकांनांही अशीच शिक्षा मिळेलं." परंतु हा हुकूम अपुरा आहे अशी आर्चबिशपने तक्रार केली त्यामुळे तो रद्द झाला. इ. स. १६२० साली उपरोक्त कायदा बदलून त्या ऐवजी "कोणत्याही राष्ट्रांतील पाखंड्यांनी यापुढे आपले विवाह, गोवा बेट, त्याच्या हद्दीतील मुलूख व बेटे यांत करूं नयेत. केल्यास त्यांना हजार असपर्त्यांचा दंड करण्यांत येईल" असा दुसरा सुधारलेला कायदा झाला. परंतु याचा परिणाम असा झाला की, हिंदूंचे विवाह परमुलुखांत होऊ लागले आणि विवाहप्रसंगी होणाऱ्या खरेदीचा फायदा, अर्थात्च बाहेरील व्यापाऱ्यांस मिळू लागला. शिवाय विवाहाच्या बंदीमुळे लोकवस्ती देखील कमी होऊन एकंदरीत पोर्तुगीज सरकारचेच नुकसान होऊ लागले. त्यामुळे ___ इ. स. १६२१ तच त्याचे उच्चाटन होऊन मूळचा १६१३ चाच कायदा पुनः अमलात आणला गेला. तरीपण या गोष्टीला पोर्तुगाल सरकारची मंजुरी १६२४ व १६२५ या सालांत मिळाली आणि या कायद्याची अंमलबजावणी विकृत होऊं लागून सारा गोंधळच माजला. इ. स. १६७८ त गोव्यांतच विवाह करायची परवानगी हिंदूंना मिळाली. परंतु त्या परवानगीच्या शर्ती इतक्या गंमतीच्या होत्या की, हिंदूंनी यापेक्षा परप्रांताचाच आश्रय घेणे श्रेयस्कर ठरविले. “घरांत दरवाजे बंद करून हे विवाह केले पाहिजेत व तेथें विवाहप्रसंगी देवळाचे पुजारी, भट, वैदिक इत्यादिकांनी हजर असता कामा नये किंवा होमहवनादिक कृत्येहि करूं नयेत." असा तो हुकूम होता. त्याची अंमलबजावणी तुस्त रीतीने होण्यासाठी, विवाहसमारंभ चालू असलेल्या घरांभोवती सुप्रसिद्ध अशा इंकिझीसांवांच्या देखरेखीखाली हत्यारबंद शिपायांचे चौकीपहारे बसविण्यांत येऊ लागले. १ घरातून लग्ने करूं नयेत असा पूर्वीचा हकुम असल्यामुळे हिंदूंनी आपले संस्कार बाहेर मंडप घालून करण्याचा परिपाठ पाडला होता. शिवाय एरवी देखील मंगलकार्यप्रसंगी मंडपाशिवाय हिंदुसमाजाचें मुळीच चालत नाही. तेव्हां हे मडप ज्या बागांतून असेल त्या बागांवरील हा हल्ला होता.