पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/163

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यामुळेच प्रमुखतः, काही सुधारणा झाली. स्वातंत्र्यकाळात कायदे पुष्कळ झाले, पण अंमलबजावणीची यंत्रणा ढासळली. कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांची पीछेहाट झाली असे नाही. इतर देशांतील परिस्थितीशी तुलना करता आपल्या येथील प्रगती अगदीच नगण्य वाटते.
 स्वातंत्र्यानंतर पारंपरिक कुटुंबव्यवस्था शहरीकरणामुळे मोडकळीस आली आणि विभक्त चौरस कुटुंबपद्धतीचा प्रसार झाला. या प्रगतिशील बदलाचा परिणाम चांगला किती आणि वाईट किती हा प्रश्न विवाद्य आहे.

■ ■

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १६०