पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/१२

हे पान प्रमाणित केलेले आहे.
कृष्णशास्त्री चिपळूणकर.





  कृष्णशास्त्री चिपळूणकर. 

______________________________________________________________

दोन मुलांचे बुद्धीमध्ये अतिशय अंतर पडेल. त्या दोन मुलांना यद्यपि प्रथमपासून ए-

कसारखें शिक्षण दिले व विवक्षित कालपर्यंत असाच क्रम अव्याहत ठेवला, तथापि

त्या कालांती पाहिले तर त्या दोहों मुलांमध्यें बुद्धीसंबंधानें शक्तिभेद स्पष्ट दिसेल.

तेव्हां या मतवाद्यांचे मती मूलतःच बुद्धि भिन्न भिन्न असून आईबापांची संस्कृत

किंवा असंस्कृत बुद्धि जशी असेल त्याप्रमाणे त्यांच्या मुलांची बुद्धि कमजास्त

विशद असते. परंतु ह्रीं दोन्हीं मतें रद्द पडतात अशा प्रकारची बुद्धि केव्हां केव्हां

कांही पुरुषांचे ठायीं दृष्टीस पडते. आतां बुद्धिविकासाला शिक्षणादि संस्कार

आवश्यक आहेत हैं सर्वोस मान्य आहेच. खनिज हिरा कितीही सतेज

असला तथापि शाणोल्लेखसंस्कार झाल्यावांचून त्याचे तेजाचा विकास

होत नाही, हें अनुभवसिद्ध आहे. हीच गोष्ट बुद्धधादिगुणविकासालाही

लागू आहे. तेव्हां गुणविकासाला संस्कार हे साधारण कारण आहेत.परंतु

असे कांहीं पुरुष आढळतात कीं त्यांना केवळ तेवढे संस्कार मात्र

मिळतात, पण इतर गोष्टी अनुकूल नसतात; तरी त्यांची बरोबरी, हीं दोन्हीं ज्यांस

अनुकूल असतात त्यांच्या हातून होत नाहीं. असा प्रकार बुद्धीसंबंधानें विशेष

पहाण्यांत येतो. अशा ठिकाणीं पूर्वोक्त दोन्हीं मतें निरर्थक होतात. अशी

अचाट बुद्धि कांही पुरुषांत केव्हां केव्हां आढळते तेव्हां - ईश्वराची त्यांजवर

विशेष कृपा–असें ह्यटल्यावांचून दुसरी तोडच नसते.

 आतां प्लेटो वगैरे जे जन्मान्तरवादी आहेत त्यांचे मतें ज्ञान हें पुन:स्मरण

आहे. ह्मणजे पूर्वजन्मीं जो बुद्धीवर विद्यादिकांचा संस्कार झाला होता तोच पुनः

थोडासा संस्कार झाला असतां आविर्भूत होतो व त्यामुळेच बुद्धिविकास होतो.

अशाच आशयाचे आमचे इकडील प्राचीन विद्वानांचेंही मत आहे. त्यांचे

मताप्रमाणे पहातां 'प्राक्तन' काय तें बलवत्तर पूर्वजन्मीं जें प्राण्याने दिले

घेतले असेल त्या मानानें या जन्मीं त्याला प्राप्त व्हावयाचें; प्रस्तुत

जन्मांतील संस्कार किंवा किया हृीं केवळ नांवाला साधनीभूत आहेत;

विद्या, धन आणि बायको ही तीन पूर्वजन्मीं जशी दिली असतील तशी

मनुष्याला या जन्मीं प्राप्त व्हावयाची; असा त्यांचा सिद्धांत आहे. 'पूर्वदत्ता च

या विद्या पूर्वदत्तं च यद्धनम् । पूर्वदत्ता च या भार्या, .……... ॥' असो. ह्या

किंवा अशासारख्या सिद्धान्ताचें अवलंबन केल्यास कित्येक पुरुषांस जी अचाट बुद्धि