पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



   कै.सौभाग्यववती डाक्टर आनंदीबाई जोशी.  १७

 _________________________________________________________________________________

घेतली, मनाचे श्लोकांपैकी दहा पांच लोक पाठ केले, व 'जय जय रघुवीर

समर्थ' ह्मणून ललकारलें, ह्मणजे मनुष्य रामदासी किंवा समर्थांचा शिष्य

झाला असे नाही. महाराष्ट्रांत, विशेषतः साताऱ्याच्या आजूबाजूस, तसले शिष्य

पायलीचे पंधरा मिळतात. परंतु दासबोधांतच शिष्याची लक्षणें सांगितली आहेत,

तशा प्रकारचा जो असेल तोच 'समर्थांचा शिष्य' या पदवीस योग्य होय. जो

आपल्या वागणुकीनें, आचरणानें व कृतीनें जो उपदेश घेतला असेल त्याची

सार्थकता करून दाखवील, तोच सच्छिष्य. या जगांत चांगला पदार्थ फार थोडा

आणि ह्मणूनच त्याची किंमत फार. त्याच मानानें सच्छिष्यही फार कमी,

आणि ह्मणूनच त्यांचें विमल यश अजरामर राहते. नाहीं तर, ज्यांच्या येण्याचा

हर्ष नाहीं आणि जाण्याचा खेद नाहीं, असल्या शिष्यांची लाखोली वाहायाची

असली तरी देखील तितके शिष्य मिळण्यास अडचण पडणार नाहीं. असो.

आपल्या उपदेशाप्रमाणे वागणारे कांहीं सच्छिष्य उत्पन्न होतील असें समर्थीस खास

वाटले असावें. परंतु महाराष्ट्रांतील स्त्रियांपैकी एकतरी आपल्या उपदेशाप्रमाणे

सर्वस्वीं वागून आपल्या हताश देशाचे पांग फेडण्याकरितां तीन हजार कोसांवर

परमुलखांत जाऊन विद्यासंपादन करून येईल, उत्कट कीर्ति उरवील, व कांहीं

एक चटक लावून सोडील, व ती आपली सच्छिष्या ' ह्मणवून घेण्यास

योग्य होईल, असें हा वरील उपदेश लिहितेवेळीं समर्थांचे मनांत तरी आले

असेल काय ? खचित आलें नसेल. असे विचार येण्यास समर्थांच्या काळची

स्त्रियांची स्थिति अनुकूल नव्हती, व अजूनही नाहीं. तथापि जर आज

समर्थ जीवंत असते तर ज्याप्रमाणे ' शिवबा ' ची कृत्यें, गुण व भक्ति हीं

मनांत येऊन व त्याचें उपदेशानुरूप वर्तन पाहून ते पुलकितगात्र व आनंदाश्रु-

परिष्ठतनेत्र होत असत, त्याप्रमाणें या देशांत आणि परदेशांत जागत असलेल्या

' सच्छिष्ये' च्या अपूर्व व अलौकिक गुणसमूहाकडे पाहून त्यांची

खचित स्थिति झाली असती. समर्थांचे जे खरे शिष्य आहेत नुसते नामधारी

व वेषधारी नव्हत ते आपल्या ह्या गुरुभगिनीचे अपूर्व व स्तुत्य चरित्र पाहून

गर्वरहित होत्साते मनःपूर्वक तिचे धन्यवाद गाताहेत.

 आतां कोणी ह्मणतील व त्यांचें ह्मणणे खरे आहे की आपल्या हिंदु समा.

जांत गुरूपदेश घेण्याचा संप्रदाय बहुतेक जातींत पुष्कळ फैलावला आहे, व