पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै०जनार्दन बाळाजी मोडक, बी. ए.
















 तितुक्यांची अंतरें धरावी । विवेके विचारें भरावी ।

 कडोविकडी विवरावी । अन्त:करणे ।।

 किती लोक ते कळेना । किती समुदाय आकळेना ।

 सकळ लोक श्रवण मनना मध्ये घाली ॥

 फड रामजावीस करणें । गद्य पद्य सांगणें ।

 परान्तरांसी राखणे । सर्व काळ ॥

 जितुकें कांही आपणास ठावें । तितुकें हळू हळू शिकवावें

 शहाणे करून सोडावें । बहुत जन ॥

 परोपरी शिकवणें । आडणुका सांगत जाणे ।

 निवळ करून सोडणें । निस्पृहासी ॥

         रामदास-दासबोध.

-