या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कै० जावजी दादाजी चौधरी.
जन्म - सन १८३८- ३९. मृत्यु - ता. ५ एप्रील सन १८९२.
ज्ञातो मात्रा मातृपक्षैर्निकृष्टः । पित्रा लोके ज्ञायते मध्यमस्तु ॥
ख्यातिं प्राप्तः स्वैर्गुणैरेव धन्यः । पुत्रैर्वित्तः कोपि पुण्याधिकेषु ॥
सदरील मदालसाचंपूकाराची उक्ति कोणास मानवत नाहीं? सर्व विचारी लो-
कांना स्वत:च्या प्रयत्नानें नांवालौकिकास चढणें अत्यंत इष्ट वाटतें; व जे तसे मो-
ठेपणास, योग्यतेस व लोकादरास पात्र झाले आहेत, होत आहेत व होतील, ते
सर्व त्यांस अत्यंत प्रियकोटींतील वाटतात हे सर्वतोपरी युक्त आहे. अर्थात् जे
दुसऱ्याचे गुणांवरून प्रख्यातसि आलेले असतात त्यांची कदर तितक्याच मानानें