पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४८) करणी होऊन देवालयाची सर्व कुलुपें पटापट पडून दारें उघ- डलीं. नंतर श्रीमोरया आंत गेले श्रीमोरेश्वरांची कोणी महा- पूजा केलेली होती ती त्यांनी एके बाजूस काढून ठेवून यथा- सांग पूजा केली. आणि आपण बाहेर आले तोंच बुलुपें पूर्व- वत् लागली. पहांटेस पुजारी येऊन दारें उघडून पाहतात तों श्रीमंगलमूर्तीची रात्रौ केलेली महापूजा कोणी दूर काढून ठेवून नवी पूजा केलेली आहे असे त्यांस दिसून आलें. शोधा अंती त्यांना समजलें की चिंचवडचे मोरयागोसावी आले आहेत त्यांनींच ही पूजा केली असावी ह्मणून त्यांनी त्यांस भेटून विचारलें तेव्हां श्रीमोरयांनी रात्रौ घडलेला सर्व चमत्कार त्यांस निवेदन केला. तेव्हांपासून श्रीमोरयांनी पूजा केल्याशिवाय पुजारी देवळास कुलुपें घालीनातसे झाले. भक्तासाठी श्रीमंगल- मूर्तीनीं ज्या अघटित लीला केल्या त्या कोठेवर वर्णाव्यात! ! ! चमत्कार १० वा. कुष्टी ब्राह्मण दिव्यदेही केला. पुढें एकेप्रसंगी चतुर्थीस श्रीमोरया वारीकरितां मोरगांवीं जाण्यास निघाले. वाटेंत एक गलितकुष्ट पापी त्यांचे नजरेस पडला त्यांनी मोरयाजवळ पाणी प्यावयास मागितलें. तेव्हां त्यांना त्याची कींव येऊन त्यांनी त्यास पाणी आणून पाजिलें