पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६४) ११ वैशाखी चतुर्थीस महाराज मोरगांवीं गेले तों तेथें एक ब्राह्मण गायत्रीपुरश्चरण करीत बसला होता. परंतु त्याची श्रद्धा मात्र श्रीमोरेश्वरावर नव्हती त्यांमुळें त्यास फलमाप्ति होईना. तेव्हां तो महाराजांस ह्मणाला की, तुझी या पाषाणास व्यर्थ कां भजता यांत देवपणा नाहीं असा मला अनुभव आला आहे. त्यावर महाराज त्याला ह्मणाले तुझा अहंकार व पूर्व जन्मींचीं पातकें तुला नडतात त्यामुळे तुला इष्टफलप्राप्ति होत नाहीं. ब्राह्मण ह्मणाला; माझी गायत्रीपुरश्चरणें फुकट गेली कीं काय ? महाराज ह्मणाले अहंकार रहित होत्साता श्रीमंग- लमूर्तीस अनन्य भावानें शरणजा व उदयीक क-हा बाईचें स्नान- करून आर्द्रवस्त्रानेंच देवलयांत येऊन श्रीचीपूजा कर ह्मणजे तुला प्रत्यय येईल. ब्राह्मणानें त्याप्रमाणें केलें व महाराजांनी सांगितल्यावरून मागे वळून पाहिलें तों भोंवताली बत्तीस चिता (कांहीं जळत असलेल्या व कांहीं अर्धवट जळालेल्या) त्याला दिसल्या तेव्हां तो घाबरून जाऊन श्रीचिंतामणिमहाराजांस शरण गेला नंतर महाराजांनी त्याला यथाविधी पुरश्चरण करावयास सांगितलें त्या योगानें कृतपापाचा क्षय होऊन त्याला थोड्याच दिवसांत सिद्धि मिळाली. १२ एकदा मोरगांवची यात्रा करून श्रीचिंतामणिमहाराज परत येत होते तेव्हां ते मंगलमूर्तीशिवाय इतर देवांचें दर्शन घेत