पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/13

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चीनची संक्षिप्त माहिती.

१४:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१७, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

केलें. ह्या घराण्याने ४०० वर्षेपर्यंत साम्राज्याचा उपभोग घेतला व तें इतकें लोकप्रिय झालें कीं, त्या घराण्याचें नांव उत्तर चीनमध्ये अद्यापही अभि- मानास्पद मानले जाते. ह्या ४०० वर्षांत चिनी संस्कृतीची दिवसानुदिवस प्रगतीच होत गेली. शाई, कागद व उंटाच्या केसाचा कुंचला हे पदार्थ ह्याच कालांत तयार झाले व त्यायोगाने लेखनकला व चित्रकला यांचा उत्कर्ष होऊं लागला. मृताबरोबर त्यांच्या गुलामांनां पुरण्याची जी चाल ह्या देशांत होती तो ह्याच घराण्यानें बंद करविली. आईबापांबद्दल २७ महिनेपर्यंत सुतक धरण्याची चाल होती. त्यांत दुरुस्ती करून २७ महिन्यांऐवजी २७ दिवसांची मर्यादा ह्याच घराण्याच्या कारकीर्दीत ठरविण्यांत आली. विद्वत्ता- दर्शक पदव्यांची स्थापनाही ह्या राजघराण्यानें केली व कनफ्युशियसच्या घराण्यास कायमची सन्मानदर्शक पदवी ह्याच घराण्यानें दिली. हल्लीं कन्फ्यु - शियसच्या घराण्यांतील मुख्य पुरुषास इंग्रज ड्युकच्या बरोबरीची मान- मान्यता आहे. ह्या राजघराण्याने राज्यविस्तारही पुष्कळ केला. घड्याळांची कल्पनाही ह्याच कारकीर्दीत उदयास आली. गायनकलेचाही उत्कर्ष ह्याच राजवटीत झाला.

चिनी लोकांच्या धर्मविषयक कल्पना.

 चिनी लोकांचे ठायीं धार्मिकता हा गुण एकंदरीत पुष्कळ कमी आहे. धर्मभोळेपणाचा मात्र त्यांच्यांत सुकाळ आहे ! परमेश्वरासंबंधानें श्रद्धा- आस्तिक्यबुद्धि- ही पुरातन कालापासून त्यांच्या समाजांत चालत आहे. परंतु बुद्धधर्माचे प्राबल्य वाढल्यापासून ह्या आस्तिक्यबुद्धीची अनास्था होत आली आहे. बुद्धधर्म हाच मुख्यतः ह्या लोकांचा धर्म आहे. बुद्ध हा सदाचार- नीति- यांच्याद्वारें लोकांचे रक्षण करितो अशी त्यांची भावना आहे. परमे- श्वराच्या जाणीवेपेक्षां सदाचार नीति-यावरच ह्या धर्माचा विशेष भर अस- ल्यामुळें ईश्वरविषयक कल्पनांचा पगडा ह्या लोकांच्या मनावर बसलेला नाहीं. यामुळे निरनिराळे धार्मिक आचार - शिष्टाचार, रूढी ह्यांचंच ह्या लोकांत विशेष बंड आहे. परमेश्वर आहे की नाहीं, याबद्दल कोणी फारसा विचार करीत नाहीं. बुद्ध संत धर्मरक्षक ह्मणून पूज्य मानले जातात. पण कित्येक घेळां त्यांची टवाळीही केली जाते. जोपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत चालले आहेत तोपर्यंत चिनी मनुष्याला देवाची जरूर भासत नाहीं व आठवणही