पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/15

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
चीनची संक्षिप्त माहिती.

१४:२१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२१, ६ डिसेंबर २०२३ (IST)

________________

सर्वांस ह्या नीतिशास्त्रज्ञांचा उपदेश मनापासून प्रिय होत आलेला आहे. चिनी बादशहा हा परमेश्वराचा पुत्र गणला जातो. हा पुरुष दरसाल एकदां मोठ्या समारंभाने पेकींग येथील देवालयांत ईशस्तवन करण्याकरितां जात असतो व तेथे एकांतांत बराच काल राहून परमेश्वराची कृपा संपादन कर- ण्याचा प्रयत्न करितो. ह्या पिता-पुत्रांचे संभाषण होते अशी कित्येकांची सम- जून आहे. परमेश्वराने एका बादशहास पत्र लिहिल्याचाही उल्लेख एका ऐति- हासिक काव्यांत आहे.

 वडिलांविषयी आदर बाळगणे, मातापितरांची निष्ठापूर्वक सेवा करणें व कोणत्याही कारणावरून त्यांचा अपमान अगर उपमर्द न करणें ही चिनी लोकांच्या आयुष्यक्रमाची मुख्य गुरुकिल्ली आहे. तीं प्रत्येक इसमाचीं अवश्य अशीं पवित्र कर्तव्ये मानली आहे. ह्या कर्तव्यांची समाजास सतत जाणीव रहावी ह्मणून निरनिराळ्या गोष्टी, कथा, दंतकथा, अनुभव वगैरे प्रकारांनीं त्याच महत्व नेहमी लोकांच्या मनावर ठसविण्यांत येत असतें. कादंबन्या व कथा, ऐतिहासिक व काल्पनिक गोष्टी यांमधूनही पुष्कळ वेळां हेच ध्येय प्रतिपादि- लेलें असतें. ह्या कर्तव्याची चाड वाळगणे हा तिकडे राष्ट्रीय सद्गुण समजला जातो. हा सद्गुण त्या लोकांच्या अंगी असल्यामुळे त्यांच्यामध्ये शिस्त, संयम व संघटनाचातुर्य ह्यांची केव्हांही वाण भासत नाहीं. सचोटी, नेकी, उद्योगशीलता, करारीपणा, चिकाटी, मार्दव, सौजन्य, सभ्यपणा, स्वामीभक्ति व संतुष्टपणा हे गुणही चिनी लोकांच्या अंगी प्रमुखत्वाने दिसून येतात.

स्त्रियांची स्थिति.

 चीन देशांतील स्त्रियांची स्थिति वरीच समाधानकारक आहे, घरांमध्ये वडील- वयोवृद्ध स्त्रीचें वर्चस्व कुटुंबातील सर्व मंडळीवर असतें. चिनी लोकांत घटस्फोटाचा प्रकार नाहीं. जर एखाद्या स्त्रीस सासरी वाईट रीतीनें वागवि ण्यांत आले तर ती माहेरी जाऊन राहते व फार तर आत्महत्त्या करिते. आत्महत्येचा प्रतिकार करणारा कडक कायदा तेथे नाहीं. परंतु जाचणुकी मुळे जर एखाद्या स्त्रीनं आत्महत्या केली तर तिचे नातेवाईक सासरच्या माणसांचा भयंकर रीतीने सूड उगवितात व अशा घराण्याची समाजांत इभ्रत रहात नाहीं. ह्या दुहेरी पेचामुळे असले प्रसंग कोणी येऊ देत नाहीत. घटस्फोटाची चाल जरी नाहीं तरी पुढील सातांपैकी एक अगर अनेक कारणां चरून घटस्फोट