पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/16

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक १ ला.

१४:२३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२३, ६ डिसेंबर २०२३ (IST)चंद्रकांत जाधव (चर्चा) १४:२३, ६ डिसेंबर २०२३ (IST)

( १ ) मुल होण्याचा असंभव, ( २ ) व्यभिचार, (३) नव आईबापांविषयीं अनास्था, ( ४ ) कापढ्य, (५) चोरी ( नवन्या घरच्या संपत्तीतून माहेर भरणें ), (६) मत्सर ( सवतीमत्सर ),(७) रक्तपित्ती. ह्या सात कारणांस पुढील ३ अपवाद आहेत:-

 ( १ ) जर एखाद्या स्त्रीने नवऱ्याच्या आईबापांबद्दल योग्य कालपर्यंत सूतक धरलें असेल; ( २ ) जर तिच्या लग्नानंतर नवरा श्रीमान् झाला असेल; आणि ( ३ ) जर तिला दुसरीकडे ( माहेर वगैरे ) जाण्यास मार्ग नसेल तर वरील ७ कारणांकरितांही घटस्फोट करूं नये, असा नियम आहे. इतर बाब - तीतही कायद्याने पुरुषापेक्षां स्त्रीस अधिक सवलती दिलेल्या आहेत. त्या अशाः-

 ( १ ) कोणत्याही स्त्रीस राजद्रोह अथवा व्यभिचार या दोन गुन्ह्यां- खेरीज इतर गुन्ह्यांबद्दल कैदेची शिक्षा देण्याची मनाई आहे.

 (२) कोणत्याही कारणावरून बांबूची ( फटक्याची ) शिक्षा स्त्रीस दिली जात नाहीं.

 विधवांना पुन्हा लग्न करण्याची शास्त्राज्ञा नाहीं; परंतु विधवाविवाहाचा प्रचार तिकडे सुरू आहे. लग्न न करणाऱ्या तरुण विधवेची स्थिति आमच्या- कडील विधवेप्रमाणेंच शोचनीय असते.

 लहानपणापासून स्त्रियांचे पाय बांधण्याची पद्धत तिकडे चालू आहे. त्यामुळे त्यांचे पाय आंखुड व लहान बारिक- हातान सौंदर्याच्या बाबतीत चिनी स्त्रिया इतर राष्ट्रास मागे टाकणार नाहीत चिनी मुली तर फारच सुंदर व देखण्या असतात पाय बांधण्याची चाल जरी सर्वत्र आहे तरी मँचू जातीच्या कांही स्त्रिया व कँटन येथे मजुरी करणान्या स्त्रिया यांच पाय उघडेच असतात. त्यांच्या लांब वेण्या आतं नष्ट होत चालल्या आहेत. इतर सुधारलेल्या देशांतील स्त्रियांप्रमाणेच चिनी स्त्रियांचे केशकलाप आतां आढळून येतात पाय बांधण्याची चालही बंद करण्याचे प्रयत्न चालू आहेत. चिनी स्त्रियांचेठायीं अपत्यप्रेम फार उत्कट असतें, तथापि मुलीपेक्षां मुलगे असावेत अशा तिकडील स्त्रियांची भावना असते. मुलगी ही परघराण्यांत जाणारी व आईबापांस-लग्नसंबंधी जबर खर्चात पाडणारा असल्यामुळे मुली न होतील तर बरें, असे बहुतेक स्त्रियांस वाटत असतें. पूर्वकाळी मुलगी झाल्यास तिचे आईबाप तिला बालपणीच मारून टाकीत, अशी आख्याइका आहे. अजूनही असा प्रकार कोठें कोठें चालू आहे, असें परस्थ लेखकाचे हाणणें