पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/17

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
चीनची संक्षिप्त माहिती

१४:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२५, ६ डिसेंबर २०२३ (IST)

आहे, पण ते खोटे ठरलेले आहे. एकंदरीत एवढी गोष्ट खरी की, मुलीपेक्षा मुलांची आवड तिकडील लोकांस जास्त आहे. मुलांच्या योगाने वडिलांचों श्राद्धकर्मे होऊन कुलाची वृद्धि व उद्धार होतो, हे मुलांविषयी जास्त आवड असण्याचे मुख्य कारण आहे. मुलींची जरी आवड नसली तरी त्या झाल्या झणजे कोणी टाकीत नाही अथवा त्यांचे कोणी हाल करीत नाही. चिनी लोकांत बहुभार्यत्वाची चाल आहे व धर्मपत्नीशिवाय प्रत्येकास ( पुरुषास ) एक अगर दोन इतर स्त्रिया ठेवण्याची परवानगी असते. प्रत्येक मुलाचे लग्न त्याच्या वयाच्या १८ व्या वर्षापासून २० व्या वर्षाच्या आंत करतातच. गरीब लोकांत एकच बायको करितात; पण सुखवस्तु व श्रीमान लोकांत दोन, तीन बायका करितात. तेथील बादशहाला मुख्य राणीशिवाय आणखी ७० बायका करण्याची मुभा असते. (आतां बादशाही नष्ट झाल्यामुळे हा प्रकार आयताच बंद झाला आहे.) चिनी स्त्रीचे आपल्या पतीवर चांगले वजन असते व त्याचेही तिजवर प्रेम असते. स्त्री हा कुटुंबाचा मुख्य आधार गणलेला आहे. मलांचे पालनपोषण करण्याचे काम स्त्रियांचे असून त्यांनां शिक्षा-शिस्तलावण्याचे काम घरांतील पुरुषांचे (मुलांच्या बापांचें ) आहे, असें तिकडे मानण्यांत येते. यामुळे बापापेक्षा मुलांनां आईचा लळा विशेष असतो. बाप प्रसंगविशेषीं कठोरपणाने वागतो; पण आई मात्र नित्य ममत्व करीत असते. ज्यांचे बाप मेलेले असतात अशा मलांच्या आयांस-आई व बाप या दोघांचीही उपरोक्त कर्तव्ये करावी लागतात. चिनी तरूण स्त्रियांस तरूणपणीं बऱ्याच काचांत राहवे लागते. पण मुलेबाळे होऊन त्या जसजशा प्रौढ होत जातात. तसतसे त्यांना स्वातंत्र्य मिळत जाते. त्या वयोवृद्ध झाल्या झणजे तर कुटुंबाच्या नेतृत्वाचे सर्व अधिकार त्यांजकडे असतात. 'प्रत्येक वयोवृद्ध स्त्री ही आपल्या कुटुंबांतील ( Dowgar Empress ) महाराज्ञी आहे,' भशी चिनी ह्मण आहे. त्यावरून तिच्या सामर्थ्याची व थोरवीची योग्यता वाचकांस कळून येईल.

 चिनी स्त्रिया सामान्यतः सुस्वभावी, सद्गुणी, सदाचारसंपन्न, उद्योगी, मुशील व पापभीरू असतात. कौटुंबिक सुखाचें त्या केंद्र असल्यामुळे त्यांचा जीवनक्रम पाश्चात्य राष्ट्रांतील स्त्रियांपेक्षा अधिक सुखावह असतो. 'गांव तेथें झारवडा' या न्यायाने कोठे कोठे अनिष्ट प्रकार जरी आढळून आले तरी ते अपवाद होत.

__________