पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/18

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक २ रा.

१४:२९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:२९, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

शिक्षण, वाङ्मय व तत्वज्ञान.

 विद्वत्ता व वाङ्मय ह्यांसंबंधानें चिनी लोकांनां अतिशय प्रेम असतें. ते लोक जात्याच विद्याभिलाषी व शांततेचे भोक्तं आहेत. युद्ध करणें हें त्यांच्या नीतिशास्त्रांत गौण मानलेले आहे. व्यापारधंदा करून सुखासमा - धानांत कालक्रमणा करणें हेंच त्या लोकांनां विशेष आवडते.यामुळे युद्ध- कलेकडे ह्या लोकांचें आजपर्यंत बरेच दुर्लक्ष होत आले आहे.परंतु गेल्या पांच पन्नास वर्षांत ही स्थिति पालटत चालली आहे. सैन्य व आरमार यांचे अलीकडे त्यांस फार महत्व वाटू लागले असून त्यांची प्रगति करण्याविषयीं चिनी राष्ट्राने गेल्या दहा वर्षांत फार जोराचे प्रयत्न सुरू केले आहेत. असें जरी आहे तरी लष्करी सत्तेपेक्षां मुलकी (Civil) सत्तेचेंच विशेष प्राधान्य अद्या- पही तेथे आहे. पूर्वकाली तर मुलकी सत्तेचेंच काय तें विशेष महात्म्य असे. यामुळे शिक्षण व वाङ्मय ह्या गोष्टींकडे त्या देशांत कधींही दुर्लक्ष होत नसे.

 मध्यम स्थितींतील चिनी लोकांचीं मुलें लष्करी पेशापेक्षां मुलकी खात्यांत नोकरी करण्याकरितां विशेष उत्सुक असतात व त्याप्रीत्यर्थ तीं शिक्षण संपादन करितात. हिंदुस्थानांतील सिव्हिल सर्वटांनां जशी एक अवघड परिक्षा द्यावी लागते तशाच प्रकारची अवघड परंतु कांहींशी जास्त त्रासदायक अशी परीक्षा होतकरू चिनी सरकारी अधिकान्यांनां व नोकरांना द्यावी लागते. ह्या परिक्षे- करितां कनफ्युशियसचें तत्वज्ञान, प्राचिन इतिहास ( चीनचा ), मेनिशिय सर्वे तत्वज्ञान, धर्मशास्त्र, काव्य, निबंधलेखन व कवित्व इतके विषय असतात. ह्या परिक्षेच्या कार्यक्रमांत व विषयांत अलीकडे अभियुक्त असा फरक होत चालला आहे. वरील शिक्षणपद्धतीने चीन देशांत गतकाली उत्तम प्रकारचे मुत्सद्दी व राजकार्यधुरंधर असे लोक निर्माण केलेले आहेत.

 ही परिक्षा हें चिनी राज्यव्यवस्थेचे एक प्रमुख व अत्यंत उज्वल असें अंग आहे. ह्या परिक्षेत पक्षपात, अन्याय वगैरे भ्रष्ट प्रकार होऊं नयेत ह्मणून फार काळजी घेण्यांत येते. परिक्षा घेण्याची पद्धति व तिचे निर्बंध अतिशय कडक आहेत. लांचलुचपत वगैरे कारणांमुळे मेहरबानी अगर पक्षपात झालेला उघडकीस आला तर अपराध्यांस प्रसंगविशेषों मृत्युची सुद्धां शिक्षा मिळण्याचा संभव असतो !