पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/20

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक २ रा.

१५

१४:४२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:४२, ६ डिसेंबर २०२३ (IST)

 परिक्षेच्या ह्या त्रासदायक प्रकारामुळे कित्येक वेळां पुष्कळ विद्यार्थ्यांनां चित्तभ्रम झाल्याची उदाहरणें आहेत. कित्येकांनां तर कांही सुचेनासें होऊन कोरे कागद प्रश्नोत्तरांच्या ऐवजी देण्याची पाळी येते! एकदां खुद बढ्या परिक्षकालाही भ्रम झाला होता असा दाखला आहे !चीनदेशाची संक्षिप्त माहिती

 ह्या परिक्षेत यश संपादन करण्याकरितां विद्यार्थ्यांनां फार कसून अभ्यास करावा लागतो. त्यामुळे पुष्कळांच्या मेंदूवर फाजील ताण पडून त्यांपैकी कित्येकांस वेडद्दी लागतें असें ह्यणतात ! ही परिक्षा जरी इतकी कठीण आहे तरी ती देण्याकरितां हजारों विद्यार्थी तयार होत असतात. परिक्षा झाल्यानंतर पक्षपात होण्यास अवकाश मिळू नये ह्मणून सर्व विद्यार्थ्यांकडील उत्तरांच्या कागदांच्या तांबड्या शाईनें नकला करण्यांत येतात व त्या नकला परिक्षकाकडे तपासण्याकरितां जातात. एकंदरीत पास होण्यास पात्र असेल तोच पास व्हावा अशाबद्दल फार दक्षता बाळगण्यांत येते; आणि त्यामुळे खरे बुद्धिवान् व हुषार लोकच ह्या परिक्षेच्या चाळणीतून निवडून निघतात. ह्याच लोकांच्या हाती राज्यकारभाराची सूत्रे येत असतात.चीनदेशाची संक्षिप्त माहिती

 चीन देशांत प्राथमिक, दुय्यम व कनिष्ठप्रतीच्या पुष्कळ शाळा आहेत. बहुतेक चिनी मुले ह्या लहान मोटया शाळांतून शिक्षण संपादन करितात. वरिष्ठ प्रकारच्या परिक्षा ३ आहेत. त्यांस बसण्याची सर्वांस सारखीच मुभा आहे. जे कोणी ह्यांपैकी एखाद्या तरी परिक्षेत पास होतात ते समाजांत मान्यता पावतात. मुलाचें लग्न होण्याचे वेळी त्याच्या परिक्षा किती पास झाल्या आहेत हें अगोदर पहाण्यांत येतें. मुलांच्या शिक्षणास खासगी व सरकारी अशा दोन्ही त-हेने उत्तेजन मिळत असतें. चिनी मूल पुस्तक वाचूं लागलें कीं, त्याचे आईबाप व आप्तइष्ट त्याच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवितात. मुलगा गरीब असून हुषार असला तर उपरोक्त परिक्षा देण्यास तो समर्थ व्हावा ह्मणून त्याच्या जिल्ह्यांतील लोक वर्गणी जमवून त्याचा खर्च चालवितात. सर्वांत श्रेष्ठ अशी परिक्षा पास झालेल्यास वरिष्ठ प्रतीची सरकारी नोकरी मिळते व त्याचा चांगला बोलबाला होतो. त्याहून कमी दर्जाची परिक्षा पास होणारास दुय्यम प्रतीच्या सरकारी नोक-या मिळतात व त्यापेक्षाही कमी योग्यतेच्या सुशिक्षितांस व्यापारी लोक नोकन्या देतात. कित्येक स्वतः व्यापारी बनतात व कित्येक खासगी रीतीनें शिक्षकाचा धंदा करितात.चीनदेशाची संक्षिप्त माहिती

 चीन देशांत वाङ्मय व कला यांचे साहचर्य अनादिकालापासून आहे.चीनदेशाची संक्षिप्त माहिती